रायगड - जिल्हयातील कायदेतज्ज्ञ ऍड.राजेश जोशी यांची कन्या रिचा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. तिने सामान्यांतील सामान्य शैक्षणिक गुणवत्तेपेक्षा अभिनयातील गुणवत्तेला प्राधान्य देत 'अँन इडियट अँड ब्युटीफुल लायर' या हिंदी-मल्याळी द्विभाषिक चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. या २०१९ वर्षाअखेरीस देशभरातील चित्रपटगृहांमध्ये रुपेरी पडद्यावर महाडची रिचा जोशी झळकणार आहे.
हिंदी-मल्याळी चित्रपटात झळकणार रायगडची मराठमोळी रिचा जोशी - Marathi girl Richa Joshi debut in Bollywood and Tollywood
रायगड जिल्ह्यातील महाडची मुलगी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'अँन इडियट अँड ब्युटीफुल लायर' या हिंदी-मल्याळी द्विभाषिक चित्रपटात तिने प्रमुख भूमिका साकारली आहे.
![हिंदी-मल्याळी चित्रपटात झळकणार रायगडची मराठमोळी रिचा जोशी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4927354-thumbnail-3x2-richa.jpg)
फोटो रिचा जोशी फेसबुकच्या सौजन्याने
रायगडची मराठमोळी रिचा जोशी
रिचाचे हे नियोजनबद्ध यश वकील असलेल्या ऍड.राजेश जोशी यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनामुळेच आहे. त्यामुळे व्यावसायिक चित्रपटाच्या भूमिका साकारताना संस्कारांना मागे न सरता महाडकर रिचा राजेश जोशीचे अभिनेत्री म्हणून बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील चित्रपटसृष्टीतील पदार्पण प्रेक्षक स्वीकारतील असा विश्वास सर्वांनाच वाटत आहे.
रायगडची मराठमोळी रिचा जोशी