महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Happy Friendship Day: मैत्रीचं समर्पक उदाहरण देणारे गाजलेले मराठी चित्रपट - फ्रेण्ड्स

कलाविश्वातही चित्रपटांमध्ये 'मैत्री' हा फॉर्मुला नेहमीच हिट ठरला आहे. चित्रपटांमध्ये दाखवण्यात आलेली मैत्रीचा अनेक जण आपल्या खऱ्या आयुष्यातही संबंध जोडतात. मैत्रीवर आधारित चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळते.

Happy Friendship Day: मैत्रीचं समर्पक उदाहरण देणारे गाजलेले मराठी चित्रपट

By

Published : Aug 3, 2019, 5:45 PM IST

'मैत्री' हा असा शब्द आहे की ज्यावर कितीही लिहिलं तरीही कमी पडेल. प्रत्येकाच्या हृदयाशी जोडलेला असा हा विषय आहे. मैत्रीसाठी प्रसंगी जीवाची बाजी लावणारेही बरेच मित्र असतात. म्हणून तर कुटुंबाप्रमाणे हे मित्र आपल्यासोबत कायम असतात. तसे पाहिले तर 'मैत्री' साजरी करण्यासाठी कोणत्याही दिवसाची आवश्यकता नाही. पण, एकमेकांप्रती असलेलं मैत्रीतलं प्रेम व्यक्त करण्यासाठी म्हणून का होईना ऑगस्टचा पहिला रविवार हा 'मैत्री' दिवस म्हणून साजरा केला जातो.

कलाविश्वातही चित्रपटांमध्ये 'मैत्री' हा फॉर्मुला नेहमीच हिट ठरला आहे. चित्रपटांमध्ये दाखवण्यात आलेली मैत्रीचा अनेक जण आपल्या खऱ्या आयुष्यातही संबंध जोडतात. मैत्रीवर आधारित चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळते.

खरी मैत्री ही नि:स्वार्थ, निरागस आणि निखळ असते. शाळा आणि कॅलेजातली मैत्री तर सर्वांसाठीच स्पेशल असते. कॉलेजच्या कट्ट्यावर भेटलेली जीवाभावाची मित्रमंडळी प्रत्येकाच्याच हृदयात एक खास स्थान मिळवतात. या सुंदर नात्यावरच्या काही खास चित्रपटांविषयी जाणून घेऊयात.

शेजारी -
मैत्रीचा विषय हा फार जुन्या काळापासून सिनेसृष्टीत हाताळला जातो. याचे उदाहरण म्हणजे १९४१ साली आलेला 'शेजारी' चित्रपट. व्हि. शांताराम यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट निखळ मैत्रीचे उदाहरण देणारा होता. केशवराव दाते, गजानन जागीरदार, जयश्री कामुलकर, गौरी, शांता मुजुमदार यांसारख्या कलाकारांनी या चित्रपटात दर्जेदार भूमिका वठवल्या होत्या. या चित्रपटातील 'लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया...' हे गाणेही अतिशय लोकप्रिय झाले होते. तसेत यातील धरण फुटीच्या सिननेही अनेकांच्या काळजाचा ठाव घेतला होता.

धडाकेबाज -
मराठीतली सुप्रसिद्ध मित्रांची जोडी लक्ष्या आणि महेश कोठारे यांच्या 'धडाकेबाज' चित्रपटानेही चाहत्यांवर राज्य गाजवले. त्यानंतर बऱ्याच चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे हे जणू एक समिकरणच बनले होते. त्यांच्या मैत्रीवर आधारित असलेले 'ही दोस्ती तुटायची नाय' या गाण्याची आजही चाहत्यांमध्ये क्रेझ पाहायला मिळते.

अशी ही बनवाबनवी -
या चित्रपटाबद्दल तर काही वेगळे सांगायला नको. अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे, सुशांत रे, सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता जोशी, प्रिया बेर्डे, अश्विनी भावे, नयनतारा, विजू खोटे यांसारख्या कलाकारांनी या चित्रपटात धमाल उडवली होती. विनोदी चित्रपटांच्या आलेल्या लाटेतील हा एक विशेष महत्त्वाचा चित्रपट ठरला होता. त्यामुळेच अजुनही या चित्रपटाची लोकप्रियता पाहायला मिळते.

दुनियादारी -
मैत्रीचे आणखी एक उदाहरण देणाऱ्या चित्रपटांमध्ये 'दुनियादारी'चे नावही हमखास घेतले जाते. २०१३ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सुहास शिरवळकर यांच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट होता. अंकुश चौधरी, स्वप्निल जोशी, जितेंद्र जोशी, संदीर कुलकर्णी, सई ताम्हणकर, उर्मिला कानेटकर, वर्षा उसगांवकर यांनी या चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या होत्या.

क्लासमेट्स -
२०१५ साली 'क्लासमेट्स' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर, सुशांत शेलार, सचित पाटील यांच्या भूमिका होत्या. मैत्रीसोबतच कॉलेजजीवनातील राजकारण या चित्रपटात पाहायला मिळाले होते.

फ्रेण्ड्स -
दोन मित्रांची गोष्ट सांगणारा 'फ्रेण्ड्स' हा चित्रपट २०१६ साली प्रदर्शित झाला होता. स्वप्निल जोशी आणि सचित पाटील यांनी या चित्रपटात दोन मित्रांची भूमिका साकारली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details