हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य इतिहासाची महती सांगणाऱ्या उर्विता प्रोडक्शन्स निर्मित ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्यदिव्य मराठी चित्रपटाची घोषणा आणि पहिल्या पोस्टरचा अनावरण सोहळा कोंढणपूर, पुणे येथे पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ ज्या किल्ल्यावर रोवली अशा तोरणा आणि स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड या किल्ल्यावरुन हेलीकॉप्टरने या चित्रपटाचे पोस्टर आकाशात लाँच करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींचे सरसेनापती होण्याचा बहुमान हंबीरराव मोहिते यांनी मिळवला. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या सोहळ्याला, चित्रपटाचे लेखक/दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे, निर्माते संदीप रघुनाथराव मोहिते पाटील, धर्मेंद्र सुभाष बोरा व सौजन्य सुर्यकांत निकम तसेच मराठा महासंघाचे राजेंद्र कोंढरे, धैर्यशील मोहिते पाटील, तळबीड गावचे सरपंच जयवंत नाना मोहिते पाटील, एस. पी. मिलिंद मोहिते पाटील, एडव्होकेट सुभाष मोहिते, एडव्होकेट प्रशांत मोहिते, सुरेश मोहिते, शिरीष मोहिते, गणेश मोहिते, अरविंद मोहिते, रोहित मोहिते, प्रतिक मोहिते, विक्रांत मोहिते, उद्योजक आणि निर्माते अभिजित भोसले, उद्योजक शेखर जावळकर, अमित गायकवाड, माधव सुर्वे, सुनील पालकर, विनोद वणवे, विशाल चांदणे, महेश हगवणे, अमोल धावडे, सुर्यकांतजी निकम, सुभाषजी बोरा, सुरज भिसे, तुषारजी भामरे, रणजीत ढगे पाटील, अभयसिंग अडसूळ, अभिनेते रमेश परदेशी, सुनील अभ्यंकर,किरण यज्ञोपवित, देवेंन्द् गायकवाड, संगीतकार नरेंद्र भिडे, गीतकार प्रणीत कुलकर्णी, शिवव्याख्याते सौरभ महेश कर्डे, कला दिग्दर्शक एकनाथ कदम, मार्केटिंग सल्लागार विनोद सातव इ. मान्यवर उपस्थित होते.