महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मराठी सिनेमा 'वेल डन बेबी'चे शूटींग होणार लंडनमध्ये! - pushkar jog latest news

'वेल डन बेबी' हा चित्रपट लंडनमध्ये शूट होणार आहे. २१ ऑक्टोबरपासून शूटींगला सुरुवात होईल. पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

पुष्कर जोग, अमृता खानविलकर

By

Published : Oct 9, 2019, 1:26 PM IST


मुंबई - मराठी चित्रपटाच्या दर्जात जशी सुधारणा होत आहे तशीच चित्रपटाच्या बजेटमध्येही वाढ होताना दिसत आहे. कथानकानुसार पूर्वी सेट उभे केले जायचे. नंतर खऱ्या लोकेशन्सवर शूटींग होऊ लागले. मराठी सिनेमा अपवाद वगळताच राज्याबाहेर शूट होऊ लागला. आता एका नव्या चित्रपटाची घोषणा झाली असून याचे शूटींग लंडनमध्ये होणार आहे.

तुम्हाला भरत जाधव आणि मोहन जोशी यांचा 'मुक्काम पोस्ट लंडन' हा चित्रपट आठवत असेल. याचे शूटींग लंडनमध्ये पार पडले होते. 'वन वे तिकीट' या चित्रपटातही परदेशवारी दाखवण्यात आली होती. आता 'वेल डन बेबी' हा चित्रपट लंडनमध्ये शूट होणार आहे. २१ ऑक्टोबरपासून शूटींगला सुरुवात होईल.

'वेल डन बेबी' चित्रपटात पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रियांका तंवर याचे दिग्दर्शन करणार आहेत. आनंद पंडित, मोहन नाडर आणि पुष्कर जोग या चित्रपटाची निर्मिती करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details