महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर यांच्या 'वेलकम होम'चे पोस्टर प्रदर्शित, या दिवशी येणार भेटीला - sumit raghwan

अभिनेत्री मृणाल कुलकर्णीची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आले आहे.

सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर यांच्या 'वेलकम होम'चे पोस्टर प्रदर्शित, या दिवशी येणार भेटीला

By

Published : May 2, 2019, 1:16 PM IST


मुंबई -मराठी चित्रपटसृष्टीत सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या लेखक दिग्दर्शकद्वयीचे स्थान फार महत्त्वाचे आहे. त्यांनी नेहमीच आशयसंपन्न, विचारप्रवर्तक विषय आपल्या चित्रपटांतून मांडले आहेत. त्यांच्या चित्रपटांचा अनेक महोत्सवांमध्ये सन्मान झाला. असाच एक महत्त्वाचा विषय त्यांच्या 'वेलकम होम' या चित्रपटातही मांडण्यात आला आहे. हा चित्रपट १४ जूनला प्रदर्शित होत आहे.

अभिनेत्री मृणाल कुलकर्णीची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आले आहे. चित्रपटाची निर्मिती अभिषेक सुनील फडतरे, विनय बेळे, अश्विनी सिधवानी, दीपक कुमार भगत यांनी केली आहे. या चित्रपटात मृणाल कुलकर्णीसह सुमित राघवन, स्पृहा जोशी, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, डॉ. मोहन आगाशे, उत्तरा बावकर, सेवा चौहान, सिद्धार्थ मेनन, मिलिंद फाटक, इरावती हर्षे, दीपा श्रीराम, अश्विनी गिरी, रेणुका दफ्तरदार, श्रुती अत्रे, शाल्व किंजवडेकर, प्रांजली श्रीकांत, अशी तगडी स्टारकास्ट आहे.

सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर यांच्या 'वेलकम होम'चे पोस्टर प्रदर्शित

चित्रपटाचे लेखन सुमित्रा भावे यांचे असून, दिग्दर्शनाची धुराही त्यांनीच सांभाळली आहे. त्यांच्यासोबत सुनील सुकथनकर हे देखील या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. पार्थ उमराणी यांनी संगीत, सुनील सुकथनकर यांनी गीतलेखन, मोहित टाकळकर यांनी संकलन, धनंजय कुलकर्णी यांनी छायांकन, तृप्ती चव्हाण यांनी कला दिग्दर्शन तर, साकेत कानेटकर यांनी पार्श्वसंगीत दिले आहे.

'घर' या संकल्पनेवर हा चित्रपट बेतला आहे. त्यातही स्त्रीचे स्वतःचे घर कोणते, असा प्रश्न उपस्थित करत त्याचा शोध घेण्यात आला आहे. चित्रपटाचे पोस्टर अतिशय सुंदर आणि लक्षवेधी आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणेच सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचा 'वेलकम होम' हा चित्रपटही त्यांच्या इतर चित्रपटांप्रमाणेच यशस्वी ठरेल, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details