महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

होय तो सलमानच आहे...पण सातारचा - ए हिरो

सातारचा सलमान या आगामी चित्रपटाचा टिझर भेटीस आला आहे. एका समान्य तरुणाची अफलातून गोष्ट या सिनेमातून पाहायला मिळेल याची झलक यात दिसते.

सातारचा सलमान

By

Published : Sep 5, 2019, 4:56 PM IST

मुंबई - अहो, आपल्यातल्या प्रत्येकाला एकदा कधीतरी वाटलेलं असतंच की, आपल्याला हिरो व्हायचंय. 'ए हिरो', अशी कुणीतरी मारलेली हाक आपल्याला आतून आवडलेली असतेच की. पण असं कधीच काहीही न वाटणाऱ्या एका सामान्य पोराला, जेव्हा त्याची लाईफच हिरो बनवते की नाय.... तेव्हा एका गोष्टीवर पक्का विश्वास बसतो. स्वप्न बघीतली तरच ती खरी होतात. अशाच एका सलमानची ही गोष्ट...होय तो सलमानच आहे...पण सातारचा आहे.

‘सातारचा सलमान’ हा चित्रपट ११ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या शीर्षकावरून हेमंत त्याच्या मागील चित्रपटाप्रमाणेच यावेळीही प्रेक्षकांसाठी एक मजेशीर विषय घेऊन येत आहे हे नक्की.

ABOUT THE AUTHOR

...view details