मुंबई -प्रथमेश परब आणि सिद्धार्थ जाधव यांचा आगामी 'खिचिक' चित्रपट सध्या चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला होता. आता या चित्रपटातील 'खिचिक झालं पोट्ट्याले', हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. आदर्श शिंदेच्या आवाजात असलेलं हे गाणं यूट्यूबवर ट्रेण्ड होत आहे.
एका दिवसातच या गाण्याला ३ लाखापेक्षा जास्त व्हिव्ज मिळाले आहेत. 'काजळली रात खुळी, बेहेकला जमाना' असे धमाल शब्द असलेलं 'खिचिक झालं पोट्ट्याले' हे गाणं सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
'खिचिक झालं पोट्ट्याले', आदर्श शिंदेच्या आवाजातील गाणं सोशल मीडियावर ट्रेण्ड - सिद्धार्थ जाधव
एका दिवसातच या गाण्याला ३ लाखापेक्षा जास्त व्हिव्ज मिळाले आहेत. 'काजळली रात खुळी, बेहेकला जमाना' असे धमाल शब्द असलेलं 'खिचिक झालं पोट्ट्याले' हे गाणं सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
'खिचिक झालं पोट्ट्याले', आदर्श शिंदेच्या आवाजातील 'खिचिक'चं गाणं सोशल मीडियावर ट्रेण्ड
चित्रपटाच्या टीमने या गाण्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्यामुळे चाहत्यांचे आभार व्यक्त केले आहेत.विजय गवंडे यांनी या चित्रपटाला पार्श्वसंगीत दिलं आहे. तर, श्रृतिका लोंढे हिच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आले आहे. सिद्धार्थ जाधव आणि प्रथमेश परब व्यतिरिक्त या चित्रपटात सुदेश बेरी, अनिल धकाते, रसिका चव्हाण, शिल्पा ठाकरे, हे कलाकार देखील झळकणार आहेत. २० सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.
Last Updated : Aug 21, 2019, 5:02 PM IST