महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

IFFI 2021 मध्ये झळकला मराठी चित्रपट गोदावरी - निखिल महाजन

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट 'गोदावरी'ला (Marathi film Godavar) स्थान मिळाले आहे. जितेंद्र जोशी प्रस्तुत व निखिल महाजनने दिग्दर्शित केलेल्या या मराठी चित्रपटाला IFFI 2021 मध्ये स्थान मिळाल्यामुळे कलाकारांनी खास आनंद केला.

IFFI 2021 मध्ये झळकला मराठी चित्रपट गोदावरी
IFFI 2021 मध्ये झळकला मराठी चित्रपट गोदावरी

By

Published : Nov 23, 2021, 3:41 PM IST

पणजी - गोव्यात सुरू असणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'गोदावरी' या मराठी चित्रपटाला (Marathi film Godavar) स्थान मिळाले आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या पूर्ण टीमने सोमवारी चित्रपट महोत्सवात सहभागी होत आपला आनंद ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला.

जितेंद्र जोशी प्रस्तुत व निखिल महाजन (Nikhil Mahajan) दिग्दर्शक असणाऱ्या या चित्रपटात जितेंद्र जोशी, गौरी नलावडे, सखी गोखले, संजय मोने यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची पूर्ण टीम आज गोव्यात दाखल होत त्यांनी या महोत्सवात आपला सहभाग घेतला होता.

IFFI 2021 मध्ये झळकला मराठी चित्रपट गोदावरी

या चित्रपटाविषयी बोलताना अभिनेत्री गौरी नलावडे म्हणाली की कोविड काळानंतर तयार झालेल्या या कलाकृतीला या चित्रपट महोत्सवात वाव मिळाला आहे. या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणजे गौतमी ची भूमिका पार पाडली असून या चित्रपटात गोदावरी आणि नाशिकचे उत्तम चित्र प्रेक्षकांना दाखविण्यात आल्याचे तिने ईटीव्ही बोलतांना सांगितले. IFFI 2021 त मराठी चित्रपट प्रसिद्ध होणे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे अभिनेत्री सखी गोखले हिने सांगितलं.

चित्रपटाविषयी थोडक्यात

जितेंद्र जोशी प्रस्तुत आणि निखिल महाजन दिग्दर्शित गोदावरी या चित्रपटात गोदावरी आणि तिच्या आजूबाजूच्या परिसरात असणारे जीवनमान या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. जितेंद्र जोशी या चित्रपटात निशिकांतची भूमिका करत असून अभिनेत्री गौरी नलावडे यात त्याच्या पत्नीची भूमिका करत आहे. यासोबतच विक्रम गोखले, संजय मोने, नीना गुप्ते व सखी गोखले यांचीही यात मुख्य भूमिका आहे.

हेही वाचा - 'जय भीम'च्या दिग्दर्शकाने मागितली माफी, जाणून घ्या काय आहे प्रकरण...

ABOUT THE AUTHOR

...view details