मुंबई - पडद्यावर 'बॉईज'ची धमाल पाहिल्यानंतर मुलींच्या भावविश्वातील रंगतही पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'गर्ल्स' या चित्रपटातून मुलींची धमाल, त्यांच्या त्यांचे गॉसिपिंगचे विषय, त्यांची जगण्याची संकल्पना या सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचा भन्नाट टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे.
या टीझरमध्ये 'बॉईज' या अफलातून 'गर्ल्स'ची ओळख करून देताना दिसत आहेत. मुली काहीच करू शकत नाहीत, असे सांगणाऱ्या या 'बॉईज'ना या 'गर्ल्स' अतिशय चपखल उत्तर देत आहेत. मनमुराद जगणे, राडा घालणे, धमाल-मस्ती करणे एकंदरच लाईफ एन्जॉय करताना त्या दिसत आहेत. सर्व बंधने झुगारून स्वछंदी जगण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे. 'हम भी किसीसे कम नही' अशाच काहीशा अंदाजात त्या आपल्याला चित्रपटात दिसणार आहेत.
हेही वाचा -जॉन अब्राहम, अर्शद वारसी 'पागलपंती'साठी सज्ज, पाहा कलाकारांचे फर्स्ट लूक