महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘बाबो’च्या भन्नाट ट्रेलरचे जबरदस्त लॉंचिंग - Baboo

फर्स्ट लुक पासून सर्वत्र चर्चेत असलेल्या मल्हार फिल्मस् क्रिएशन निर्मित ‘बाबो’ या मराठी चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या प्रसंगी चित्रपटाचे निर्माते सचिन बाबुराव पवार, सहनिर्माती तृप्ती सचिन पवार, दिग्दर्शक रमेश चौधरी यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

‘बाबो’ या मराठी चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर

By

Published : May 18, 2019, 5:35 PM IST


‘बाबो’या चित्रपटात एका गावात असणारे इरसाल नमुने व त्यांच्या भानगडी मिश्कील पद्धतीने मांडल्या आहेत. ट्रेलरची सुरुवातच मुळात डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या एका सुंदर गावाचे चित्र दाखवत मंगलाष्टकाने होते. त्यात एक अभिनेता भारत गणेशपुरे स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करताना नमुना शब्दाला शोभेल अशा टी.व्ही. अँकरच्या भूमिकेत दिसतो. तर विनोदी भूमिका साकारणारे किशोर कदम यांची सयाजी शिंदे यांच्या बरोबर गावाकडची खुमासदार शैलीतील भांडणांची जुगलबंदी पहायला मिळते.

या गावाच्या अनेक समस्या आहेतच, पण त्याही पेक्षा मोठी समस्या एका नवविवाहित दाम्पत्याला आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करायची आहे, मात्र त्यांचा जागरण गोंधळ झालेला नाही आणि दुसरीकडे गावात अवकाशातील यान कोसळणार असल्याची बातमी टीव्हीवर ऐकायला मिळते. त्यानंतर गावात एकच कल्लोळ निर्माण झाला आहे.

तर चित्रपटाची कथा अरविंद जगताप यांची आहे. या चित्रपटात आजवर अनेक मनोरंजक भूमिका साकारणाऱ्या कलावंतांची मांदियाळी बघायला मिळेल, यामध्ये प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे, संवेदनशील कवी, अभिनेते किशोर कदम यांच्यासह भारत गणेशपुरे, किशोर चौगुले, प्रतिक्षा मुणगेकर, निशा परुळेकर, विजय निकम, जयवंत वाडकर, रमेश चौधरी, विनोद शिंदे, मंजिरी यशवंत, स्मिता डोंगरे, प्रिया उबाळे, अरुण शिंदे, पुष्पा चौधरी, प्रकाश भागवत, वैशाली दाभाडे, आकाश घरत, ज्योती पाटील, प्रमोद पंडित, महेश देवकाते, गणेश कोकाटे मयूर कोंडे, श्रेया पासलकर, विनोद शिंदे आदी कलाकारांची फौज या चित्रपटात आहे. या चित्रपटाला रोहित नागभिडे आणि हर्ष-करण-आदित्य (ट्रीनिटी ब्रदर्स) यांचे संगीत लाभले असून ‘म्याड रं’ नंतर आता ‘नाचकाम कंपल्सरी’ हे गाणे सर्वत्र गाजत आहे. मंगेश कांगणे गीतकार आहेत. कलाकारांच्या मांदियाळीने नेमकी काय धमालमस्ती केली आहे? हे येत्या ३१ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्राला समजणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details