मुंबई - आज सर्वच जण कोरोनाबद्दल राज्य सरकारच्या सूचनांच पालन करण्यासाठी घरात बसून असले तरीही प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढणाऱ्या योध्याबदद्दलची कृतज्ञतेची भावना काही कुणाच्याच मनातून जात नाहीये. तीच भावना व्यक्त करण्यासाठी या गाण्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. संगीतकार नरेंद्र भिडे यांची ही संकल्पना असून त्यांनीच या गाण्याला संगीत दिलेले आहे. तर गीतकार कवी वैभव जोशी यांनी हे गाणं लिहिलेलं आहे. गायक दत्तप्रसाद रानडे यांनी हे गाणं गायलं आहे. तर तन्मय भिडे आणि किरण यज्ञोपवीत यांनी या गाण्याच व्हिडीओ दिग्दर्शन केलेलं आहे.
जीव धोक्यात घालून कोरोनापासून संरक्षण करणाऱ्या योध्यांना मराठी कलाकारांकडून कडकडीत 'सलाम' - जीव धोक्यात घालून कोरोना पासून संरक्षण करणाऱ्या योध्याना मराठी कलाकारांकडून कडकडीत 'सलाम'
संपूर्ण जग आज कोरोनासारख्या असाध्य रोगावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतंय. आपल्या देशातही डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी,पोलीस यंत्रणा, सफाई कामगार असे सगळेच या रोगापासून इतरांचं संरक्षण करण्यासाठी दिवस रात्र राबताना दिसतायत. याच निनावी चेहऱ्यांना आपल्या गाण्याद्वारे कडकडीत सलाम करण्यासाठी काही मराठी कलाकरांनी पुढाकार घेतला आहे.
हे गाणं अतिशय सुंदर झालं असून प्रत्येकाच्या मनात उमटलेले भाव गाण्यातून मांडण्यात आले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कार्य करणारे डॉक्टर, त्याची तपासणी करण्याची पध्दत शोधून काढणाऱ्या डॉ. भोसले, या लढ्यात लोकांना मदत करण्यासाठी पुढे आलेले उद्योगपती रतन टाटा, अझीम प्रेमजी, सुधा मूर्ती, अभिनेता अक्षय कुमार, बकस्टेज कलाकाराना मदत देण्यासाठी पुढाकार घेतलेले अभिनेते निर्माते प्रशांत दामले, सुबोध भावे, पुण्यात मदतीसाठी पुढाकार घेणारे अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचेही फोटो आवर्जून वापरण्यात आले आहेत.
या सोबतच कोरोनाशी दोन हात करताना नेतृत्व गुणांची कसब दाखवून दिलेले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याही फोटोंचा वापर करून त्यांनाही सलाम करण्यात आला आहे..थोडक्यात काय तर कोरोनाशी सामना करण्यासाठी आपलं सर्वस्व झोकून देऊन धोका पत्करून प्रसंगी आपल्या आप्तेष्टांपासूनही लांब राहून त्याना सलाम करण्यासाठी हे गाणं तयार करण्यात आलं आहे..पहा तुम्हालाही हे गाणं पाहून मनात तेच भाव निर्माण होतात की नाही ते..