महाराष्ट्र

maharashtra

'थर्डक्लास राजकारण', महाराष्ट्रातील  राजकीय घडामोडींवर शरद पोंक्षेची सडेतोड टीका

By

Published : Nov 24, 2019, 2:10 PM IST

निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी जर विरोधी विचारसरणीचे पक्ष मिळून सत्ता स्थापन करत असतील, तर हा लोकशाहीचा अपमान आहे, असेही ते म्हणाले.

'थर्डक्लास राजकारण', महाराष्ट्राच्या राजकारणावर शरद पोंक्षेची सडेतोड टीका

मुंबई -गेल्या महिनाभरापासून राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुरू असतानाच शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ही राजकीय स्थिती पाहता राजकारणासोबतच कलाविश्वातही याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. अभिनेते प्रविण तरडे, सोनाली कुलकर्णी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून यावर आपली मतंही व्यक्त केली. आता अभिनेते शरद पोंक्षे यांनी देखील 'थर्डक्लास राजकारण', अशी पोस्ट टाकत राजकीय परिस्थितीवर घणाघाती टीका केली आहे.

एका माध्यमाशी बोलताना ते म्हणाले, की 'लोकशाहीनं आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. ज्या विचारसरणीचे नेते सत्तेत यावे, असे आपल्याला वाटते, त्या पक्षाला आपण मत देतो. मात्र, निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी जर विरोधी विचारसरणीचे पक्ष मिळून सत्ता स्थापन करत असतील, तर हा लोकशाहीचा अपमान आहे. जर, राजकिय पक्ष सत्तेसाठी असे करू लागले, तर लोकशाही अपयशी ठरली असेच म्हणावे लागेल'.

हेही वाचा -Breaking - सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांकडून कागदपत्रे मागवली, आता लक्ष्य उद्याच्या सुनावणीकडे

महाराष्ट्राचा सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. बहुमत चाचणी केव्हा घ्यायची याचा निर्णय उद्या (सोमवार २५ नोव्हेंबर) होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट रातोरात हटवून काल (शनिवार २३ नोव्हेंबर) देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्याविरोधात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

यासंदर्भात रविवारी सकाळी ११.३० वाजता सुनावणी झाली. साधारण ५५ मिनिटे चाललेल्या सुनावणीत न्यायमूर्ती एन. व्ही रमण्णा, अशोक भूषण आणि संजीव खन्ना यांनी राज्यपालांनी दिलेले पत्र आणि सरकारने बहुमत सिद्ध करण्यासाठी दिलेली कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा -महाराष्ट्रच्या सत्तापेचाचा निर्णय लांबणीवर, सर्वोच्च न्यायालयात उद्या पुन्हा सुनावणी

ABOUT THE AUTHOR

...view details