मुंबई- प्रसिद्ध मराठी अभिनेते सचिन पिळगावकर यांनी रविवारी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. पंडित जवाहरलाल नेहरूंसोबतची एक खास आठवण त्यांनी सांगितली. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी मला लाल गुलाब दिला होता. ती आठवण मी कधीही विसरू शकत नाही, असे ते म्हणाले.
नेहरूंनी 'या' मराठी कलाकाराला गुलाब देत म्हटले होते 'खूप मोठा होशील' - सचिन पिळगावकर पंडित जवाहरलाल नेहरू
मी मंचावरून खाली जाऊ लागलो, पण तेवढ्यात मला 'सुनो!' असा आवाज आला, तो पंडितजींचा होता. त्यांनी मला त्यांच्या मांडीवर बसवले. त्यांच्या कोटावर असलेले लाल गुलाब बाहेर काढून त्यांनी माझ्या शेरवानीवर लावले आणि 'जा... तू खूप मोठा होशील' असे म्हणाले.
सचिन म्हणाले, तो क्षण मी कधीही विसरू शकत नाही. मला नेहमी आठवते, 1963 साली माझा पहिला मराठी चित्रपट 'हा माझा मार्ग एकला' यासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार घेण्यासाठी मी दिल्लीला गेलो होतो. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थितीत देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन पुरस्कार देणार होते. मी पाच वर्षांचा होतो आणि काळ्या रंगाची शेरवानी, चुडीदार पायजमा घातला होता. एक नवीन चप्पल जोडा घातला होता, जो आईने माझ्यासाठी आणला होता. तो घालून मी मंचावर गेलो. पुरस्कार मिळाल्यानंतर मी या दोघांना अभिवादन केले आणि मंचावरून खाली जाऊ लागलो, पण तेवढ्यात मला 'सुनो!' असा आवाज आला, तो पंडितजींचा होता. त्यांनी मला त्यांच्या मांडीवर बसवले. त्यांच्या कोटावर असलेले लाल गुलाब बाहेर काढून त्यांनी माझ्या शेरवानीवर लावले आणि 'जा... तू खूप मोठा होशील' असे म्हणाले.