महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 24, 2019, 12:35 PM IST

ETV Bharat / sitara

मसाल्याने ठासून भरलेला मराठी 'दंडम' २७ डिसेंबरला सिनेमागृहांत

मराठी रसिक प्रेक्षकांच्या दिमतीला येतोय, 'व्ही सत्तू' दिग्दर्शित मराठी चित्रपट अॅक्शनपट 'दंडम'. यात मनोरंजनाचा भरपूर मसाला आहे. अॅक्शनपट " दंडम " प्रेक्षकांच्या दिमतीला येतोय २७ डिसेंबरला. दरम्यान चित्रपटाची झलक दाखवणारा ट्रेलर रिलीज झाला आहे.

Marathi action movie Dandam
मराठी सिनेमा दंडम


दाक्षिणात्य सिनेमात दिसणारी वेगवान अॅक्शन, ठसकेबाज गाणी आणि मसालेदार कथानक मराठी फार क्वचितवेळा पाहायला मिळते. 'दंडम' नावाचा एक नवा चित्रपट प्रदर्शनाच्या मर्गावर आहे. यात तडाखेबंद फाईट, अॅक्शन, रोमान्स पाहायला मिळणार आहे. तर यात नेहमीच्या चेहऱ्यांना वगळून नव्या फ्रेश चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. एंट्रीलाच काळजाला हात घालणारा डॅशिंग मयूर राऊत, तसेच रिपुंजय लष्करे, याबरोबरच शरीर सौष्ठवाच्या मैदानातला बादशहा मी. युनिव्हर्स संग्राम चौगुले हे दमदार त्रिकुट तर आहेच पण त्याच जोडीला खलनायक सुद्धा तितक्याच प्रतिभेने साकारणारे अक्षय जांभळे, संतोष वारे हे देखील प्रेक्षकांची मन जिंकतील .आपल्या दिलखेचक अदांनी घायाळ करणारी रिद्धी कुमार याचित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.

अॅक्शनपट " दंडम " प्रेक्षकांच्या दिमतीला येतोय २७ डिसेंबरला. दरम्यान चित्रपटाची झलक दाखवणारा ट्रेलर रिलीज झाला आहे.

अॅक्शपटाचे स्वप्न सत्यात उतरवणारे स्टार दिग्दर्शक व्ही. सत्तू या निमित्ताने बोलताना म्हणाले कि. "मराठी सिनेमा जर साऊथ च्या तोडीस तोड बनवायचा असेल तर तितक्याच ताकदीची ऍक्शन , दमदार हिरो त्याला टक्कर देऊ शकेल असा व्हिलन हे सगळं पाहिजे". "सर्व नवे कलाकार घेऊन चित्रपट बनविण्याचा प्रवास खडतर तर होताच पण तितकाच आनंददायीही होता". "या सिनेमात सिक्स पॅक असलेला फक्त हिरोच नाही तर सहकलाकारांचेही कमावलेले शरीर प्रेक्षकांना पाहता येणार आहे". "हा नुसता ऍक्शन पट नसून एक आशयघन आणि मनोरंजन भरलेला एक परिपूर्ण चित्रपट आहे". "मराठी रसिक प्रेक्षकांसाठी हा एक नवीन रोमांचक अनुभव असेल याची मला खात्री आहे".

खास आकर्षण असेलला मी. युनिव्हर्स संग्राम चौगुले. हा " दंडम" याचित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच पदार्पण करत आहे. तो याविषयी बोलताना म्हणाला, "पडद्यावर अॅक्टिंगच्या जोडीला अॅक्शन होती आणि अॅक्टर होण्याचं माझं स्वप्नही होतं. त्यामुळे मला हा चित्रपट ऑफर झाला तेव्हा कथानक ऐकल्यावर लगेच मी होकार कळवला. आता चित्रपट सिनेमागृहात यायचा दिवस जवळ आला आहे. कोणतीही गोष्ट सुरुवातीला करताना दडपण येते आणि मीही त्यातून सुटलेलो नाही. इथे प्रेक्षकांपेक्षा मोठा कोणताच कलाकार नाही. माझ्या चाहत्यांनी आजवर मला जे प्रेम दिलं त्याप्रमाणे हा चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षकही देतील याची मला खात्री आहे."

"दंडम" चित्रपटातील जिभेवर सहज रुळणारी गाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याचित्रपटातील ' द बंगळंग सॉंग ' हे गाणं यूट्यूबवर सध्या पाहिले जात आहे. या गाण्याबरोबरच, 'दिल माझं बिगी बिगी', 'झंझावत' ही प्रसेनजीत कोसंबी, जसराज जोशी, आदर्श शिंदे, आनंदी जोशी यांनी गायलेली गाणीसुद्धा यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात येणार आहेत आणि रसिक प्रेक्षकांना ती नक्कीच आवडतील अशी आशा निर्मात्यांना आहे..

बीड सारख्या ग्रामीण भागाचा विकास करू इच्छिणारा एक प्रामाणिक कार्यसम्राट कलेक्टर ' दंडम' मधून आपल्याला दिसेल. एका प्रामाणिक अधिकाऱ्याच्या मागे सामान्य जनता कशी उभी राहते हे आपल्याला पाहता येईल. भ्रष्ट व्यवस्थेमध्ये दबून न जाता एक अधिकारी काय बदल घडवू शकतो यासंबंधीची ही सुरस कथा आहे. आशयघन कथानक, दमदार अॅक्शन, मोहक अदा, उत्कृष्ट संगीत, इत्यादींनी परिपूर्ण असलेला ' दंडम ' २७ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details