महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अनुरागच्या मालमत्तांवर आयकर विभागाच्या छाप्यानंतर आणखीन काही जणांच्या चौकशीची शक्यता - अनुराग कश्यप आयकर छापेमारी

अनुराग कश्यप आणि तापसी पन्नु यांच्या मालमत्तांवर काल आयकर विभागाने छापेमारी केली. त्यांच्यानंतर यासंदर्भात इतर काही जणांवरही कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Anurag
Anurag

By

Published : Mar 4, 2021, 8:16 AM IST

मुंबई- करचुकवेगिरी प्रकरणांमध्ये बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू, दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्याबरोबर फिल्म मेकर मधू वर्मा मंटेना व विकास बहल यांच्या घर व कार्यालयावर बुधवारी छापेमारी करण्यात आलेली होती. मुंबई व पुण्यात ही छापेमारी करण्यात आली. या छापेमारी दरम्यान मुंबईत फँटम फिल्म जोगेश्वरी येथील कार्यालयावर छापा मारण्यात आला. दिग्दर्शक अनुराग कश्यप राहत असलेल्या ओशिवरा परिसरातील इमारतीवर व अभिनेत्री तापसी पन्नू राहत असलेल्या गोरेगाव परिसरातील घरावर आयकर विभागाने छापा मारलेला आहे.

2011 मध्ये अनुराग कश्यप मधु वर्मा मंटेना, विक्रमादित्य मोटवाने आणि विकास बहल या चौघांनी मिळून फँटम फिल्मची स्थापना केली होती. मात्र ऑक्टोबर 2018 मध्ये ही फिल्म कंपनी बंद करण्यात आली होती. अनुराग कश्यप हा त्याच्या सोशल माध्यमांवर केंद्र सरकारच्या कारभारावर नेहमीच टीका करत आलेला आहे. अभिनेत्री तापसी पन्नू हिने शेतकरी आंदोलनाच्या समर्थनामध्ये तिच्या सोशल माध्यमांवर शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला होता.

मुंबई व पुणे येथे आयकर विभागाचे छापे मारण्यात आल्यानंतर मुंबईतील अनुराग कश्यप व तापसी पन्नूच्या घरावरून, फँटम फिल्म कार्यालयात मारलेल्या छापेमारीत कुठल्या प्रकारचे पुरावे व इतर गोष्टी आढळून आल्या आहेत याचा खुलासा आयकर विभागाकडून करण्यात आलेला नाही. यासंदर्भात यापुढे जाऊन आणखीन काही जणांची चौकशी होण्याची सूत्रांची माहिती आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details