पुणे - सलमान खानचा 'किक २' हा चित्रपट लवकरच तयार करण्यात येणार आहे. या चित्रपटात सहायक भूमिका देण्याच्या बहाण्याने एका महिलेची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. या महिलेकडून तब्बल १ लाख ८२ हजार ६०० रुपये उकळले गेले आहेत. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात एका अज्ञात मोबाईल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलमान खानच्या 'किक २' चित्रपटात भूमिका देण्याच्या बहाण्याने पुण्यातील महिलेची आर्थिक फसवणूक - सलमान खान
सिनेसृ़ष्टीत काम करण्याची संधी प्रत्येकालाच हवी असते. अशातच जर सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळत असेल, तर त्यासाठी काय वाट्टेल ते करण्याची तयारी असते.
सलमान खानच्या 'किक २' चित्रपटात भूमिका देण्याच्या बहाण्याने पुण्यातील महिलेची आर्थिक फसवणूक
१५ जून ते ६ ऑगस्टदरम्यान हा प्रकार घडला. तक्रार आल्यानंतर वारजे पोलीसांनी एका अज्ञात मोबाईल धारकावर गुन्हा दाखल केला आहे.
सिनेसृ़ष्टीत काम करण्याची संधी प्रत्येकालाच हवी असते. अशातच जर सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळत असेल, तर त्यासाठी काय वाट्टेल ते करण्याची तयारी असते. मात्र, यामुळे आपली फसवणूकही होऊ शकते, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं.