मुंबई - दाक्षिणात्य चित्रपटांच्या भव्यतेच्या प्रेमात संपूर्ण देश आहे. आकर्षक सेटस्, डोळ्याची पारणे फेडणारी भव्यता, आक्रमक अॅक्शन आणि अचाट कथा यांच्या बळावर हे चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणतात. असाच एक चित्रपट येऊ घातलाय. त्याचे शीर्षक आहे 'ममंगम'.
मामुटींच्या 'ममंगम' सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली, हिंदीतही होणार रिलीज - Mammootty starring Mamangam to release on 12 Dec 2019
दाक्षिणात्य सुपरस्टार मामुटी यांचा बहुभाषिक ममंगम हा चित्रपट येत्या १२ डिसेंबरला रिलीज होत आहे. या भव्य चित्रपटाची प्रतीक्षा आता देशभर सुरू झाली आहे.
![मामुटींच्या 'ममंगम' सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली, हिंदीतही होणार रिलीज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5049448-thumbnail-3x2-kk.jpg)
'ममंगम' सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख
मल्याळी सुपरस्टार मामुटी या चित्रपटातून भव्य अॅक्शन करताना दिसणार आहे. मामुटीचा चाहता वर्ग केवळ दक्षिणेत नाही. अनेक हिंदी चित्रपटामुळे त्यांची ओळख बॉलिवूडला आहे. 'ममंगम' हा चित्रपट दाक्षिणात्य भाषांबरोबरच हिंदीतही झळकणार आहे.
'ममंगम' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली आहे. येत्या १२ डिसेंबरला हा चित्रपट मल्याळम, तेलुगु, तामिळ आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन एम. पद्मकुमार यांनी केले असून वेनु कुणाप्पल्ली यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.