महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'खारी बिस्कीट' चित्रपटातील मेकिंग सॉंग प्रदर्शित - Marathi Film Making of Khari Biscuit

येत्या १ नोव्हेंबरला खारी बिस्कीट हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटातील मेकिंग सॉंग झी म्युजिक मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.

'खारी बिस्कीट' मेकिंग सॉंग

By

Published : Sep 17, 2019, 7:01 PM IST

झी स्टुडिओज आणि ड्रीमिंग ट्वेन्टी फॉर सेव्हन यांची निर्मिती असलेला खारी बिस्कीट येत्या १ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. खास रक्षाबंधनाच्या निमित्ताने या चित्रपटातील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले. अवघ्या दोन दिवसात १० लाखाहून जास्त हिट्स मिळवलेल्या या गाण्यांबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. नुकतेच या चित्रपटातील मेकिंग सॉंग झी म्युजिक मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. या गाण्यात मुलांनी सेट वर केलेली मज्जा मस्ती अनुभवायला मिळत आहे.

'खारी बिस्कीट' म्हणजे नेमके काय? हा प्रश्न कित्येकांना पडला होता. तर ही आहे चिमुरड्या भावंडांची जोडगोळी. अवघ्या पाच वर्षांच्या गोंडस खारी हे जग तिच्या डोळ्यांनी पाहू शकत नसली तरी ती स्वप्नं बेमालूमपणे पाहते. ही गोष्ट आहे पदरी गरिबी असली तरी तिच्या डोळ्यात कधीही पाणी आणू न देण्यासाठी, तिचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत झटणाऱ्या आणि तिला फुलासारखं जपणाऱ्या बिस्कीटची आणि त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या खारीची. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात बिस्कीटची भूमिका आदर्श कदमने केलीय तर खारी साकारलीय वेदश्री खाडिलकर हिने याशिवाय सोहम जाधव, स्वानंद शेळके, शर्व दाते यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details