मुंबई -इंटरनेट सेंसेशन बनलेल्या रानू मंडल या त्यांच्या एका फोटोमुळे बऱ्याच चर्चेत आल्या. सोशल मीडियावर त्यांचा हेवी मेकअप लूक असलेला फोटो व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी त्यांची चांगलीच खिल्ली उडवली. मात्र, हा फोटो खोटा असल्याचं आता समोर आलं आहे. त्यांचा मेकओव्हर करणाऱ्या मेकअप आर्टिस्ट संध्या यांनीच या फोटोबद्दल एक खुलासा केला आहे.
संध्या यांनी सोशल मीडियावर रानू यांच्या खऱ्या मेकअपचा फोटो शेअर केला आहे. तसेच, सोशल मीडियावर त्यांचा व्हायरल होत असलेला फोटो हा फोटोशॉप करून एडिट केलेला आहे, असे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
हेही वाचा -शाहिद कपूरने शेयर केला 'जर्सी'च्या तयारीचा व्हिडिओ
'सर्व ट्रोल आणि विनोद हे चांगले आहेत. आम्ही त्यावर हसलो देखील. मात्र, कधीकधी हे ट्रोलिंग जास्त झाल्यावर भावना दुखावल्या जातात. रानू यांची खिल्ली उडवण्यासाठी कोणीतरी मुद्दामहून त्यांचा खोटा फोटो व्हायरल केला', असं त्या त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.
मेकअप आर्टिस्ट संध्या यांनी शेअर केलेला व्हिडिओ
रानू यांचा खोटा फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांचा मेकअप करणाऱ्या आर्टिस्टलाही ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. मात्र, संध्या यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून ट्रोलर्सला चांगलेच उत्तर दिले आहे.
हेही वाचा -पाहा, समीर विद्वन्सच्या मल्टी स्टारर राजकीय नाट्याचा 'धुरळा'