महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'हंगामा २' च्या नव्या पोस्टरवर मजेशीर पोजमध्ये दिसले सितारे - शिल्पा शेट्टी- कुंद्रा, दाक्षिणात्य अभिनेत्री प्रणिता सुभाष आणि परेश रावल यां

प्रियदर्शन बनवत असलेल्या आगामी 'हंगामा २' चे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आले आहे. यात मीज़ान जाफरी, प्रणिता सुभाष, शिल्पा शेट्टी आणि परेश रावल आपल्या व्यक्तीरेखेमध्ये झळकले आहे. १४ ऑगस्ट २०२० ला रिलीज होणार आहे.

Hungama 2
'हंगामा २'

By

Published : Mar 9, 2020, 7:01 PM IST

मुंबई - कॉमेडी नाट्य असलेल्या 'हंगामा २' चित्रपटाचे नवे पोस्टर निर्मात्यांनी प्रसिध्द केले आहे. आकर्षक अशा दिसणाऱ्या या पोस्टरमध्ये कलाकार मात्र मजेशीर पोजमध्ये दिसत आहेत.

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी हे पोस्टर आपल्या ट्विटरवर शेअर केले आहे. यात यात मीज़ान जाफरी, प्रणिता सुभाष, शिल्पा शेट्टी आणि परेश रावल आपल्या व्यक्तीरेखेमध्ये झळकले आहे. १४ ऑगस्ट २०२० ला रिलीज होणार आहे.

'हंगामा २' या चित्रपटात शिल्पा शेट्टी- कुंद्रा, दाक्षिणात्य अभिनेत्री प्रणिता सुभाष आणि परेश रावल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

परेश रावल यांनी 'हंगामा' चित्रपट प्रियदर्शनसोबत काम केले होते. ते आता पुन्हा सात वर्षानंतर एकत्र काम करणार आहेत. रावल यांनी 'हेरा फेरी', 'भागम भाग' आणि 'मालामाल विकली' यासारख्या विनोदी चित्रपटात काम केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details