मुंबई -कलर्स मराठीवरील 'बिग बॉस मराठी' सिझन २ हे पर्व बरेच चर्चेमध्ये आहे. अगदी पहिल्या दिवसापासून स्पर्धक त्यांच्या भांडणाने, वाद विवादाने घर गाजवत आहेत. अवघ्या बारा तेरा दिवसामध्ये घरात ग्रुप्स देखील तयार झाले आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये आता नॉमिनेशन प्रक्रिया सुरु झाली असून या घरामधून आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य असणार आहे. नुकतंच घरातलं पहिलं एलिमीनेशन पार पडलं.
या आठवड्यामध्ये पराग कान्हेरे, अभिजीत केळकर, विणा जगताप, मैथिली जावकर, माधव देवचके आणि नेहा शितोळे हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले होते. या ६ जणांमधून कोणत्या स्पर्धकाला बाहेर जावे लागणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. शेवटी अभिजीत केळकर आणि मैथिली जावकर हे डेंजर झोनमध्ये होते. यामधुन मैथिलीला अखेर बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागणार आहे.