महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'मैं तारे'! 'नोटबुक'साठी भाईजानने पुन्हा गायले गाणे

याआधीही सलमानने २०१५मध्ये आलेल्या 'हिरो' चित्रपटातील 'मैं हूँ हिरो तेरा' या गाण्याला आवाज दिला होता. याशिवाय 'किक'मधील 'हँग ओव्हर' गाणंही त्याने गायलं होतं

नोटबुकमधील गाण्याला सलमानचा आवाज

By

Published : Mar 16, 2019, 3:26 PM IST

मुंबई- बॉलिवूड भाईजान सलमान खान अनेक नव्या चेहऱ्यांना चित्रपटसृष्टीत संधी देत असतो. आता त्याने 'नोटबुक' चित्रपटातून प्रनूतन बहल आणि जहर इकबाल यांना लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता यातील खास गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


हे गाणं अधिक खास असण्याचं कारण आहे त्या गाण्याला आवाज दिलेला गायक. भाईजान म्हणजेच सलमान खानने या गाण्याला आपला आवाज दिला आहे. त्यामुळे, त्याच्या चाहत्यांसाठी हे गाणं खास असणार यात काही शंका नाही. 'मैं तारे' असे शीर्षक असणाऱ्या या गाण्याचा टीझर सोशल मीडियावर शेअर करत याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

याआधीही सलमानने २०१५मध्ये आलेल्या 'हिरो' चित्रपटातील 'मैं हूँ हिरो तेरा' या गाण्याला आवाज दिला होता. याशिवाय 'किक'मधील 'हँग ओव्हर' गाणंही त्याने गायलं होतं. या दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. त्यामुळे आता हे गाणंही भाईजनाच्या चाहत्यांची मने जिंकेल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.


ABOUT THE AUTHOR

...view details