मुंबई -चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर ( Mahesh Manjrekar Film ) यांचा 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' ( Naay Varanbhaat Loncha Kon Naay Koncha ) हा चित्रपट वादाच्या भाोवऱ्यात सापडला आहे. मुंबईतील गिरणी कामगार कुटुंबांचे विकृत चित्रण दाखवल्याचा आरोप या चित्रपटावर करण्यात आला आहे. त्याविरोधात महिला आयोगाने तक्रार नोंदवली होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर सर्व सोशल मिडिया प्लॅटफोर्मवरून हटवला आहे.
'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' ( Naay Varanbhaat Loncha Kon Naay Koncha ) हा चित्रपट 14 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. या चित्रपटात दाखवलेल्या विकृत चित्रणामुळे राष्ट्रीय महिला आयोगाने ( National Commission for Women ) त्याची तक्रार केंद्रीय माहिती प्रसारण खात्याकडे केली होती. त्याच पार्श्वभुमीवर आता या चित्रपटाचा ट्रेलर सर्व सोशल मिडिया प्लॅटफोर्मवरून हटवला आहे.
मांजरेकारांना राज्य महिला आयोगाची नोटीस
महेश मांजरेकर यांनी 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' विकृत चित्रीकरणाबाबत आपली भूमिका मांडावी, असे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत.