हैदराबाद - दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू यांचा तेलगू ब्लॉकबस्टर "पोकीरी" हा चित्रपट १५ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर राज्य केले. हा चित्रपट म्हणजे ‘कल्ट क्लासिक’ असल्याचे मत सुपरस्टारची पत्नी अभिनेत्री नम्रता शिरोडकर हिने व्यक्त केलंय.
"त्या काळातील एक चाकोरी तोडणारा हा चित्रपट होता. हा एक कल्ट क्लासिक चित्रपट होता. मास आणि क्लास यांचा सुरेल संगम यात होता." असे नम्रता शिरोडकर हिने म्हटलंय.
२००६ मध्ये प्रदर्शित झालेला "पोकीरी" हा चित्रपट पुरी जगन्नाथ यांनी दिग्दर्शित केला होता. या अॅक्शन थ्रिलरमध्ये इलियाना डिक्रूझ, प्रकाश राज, नसार, आशीष विद्यार्थी आणि सयाजी शिंदे यांच्या मुख्य भूमिका आहेत.
हा चित्रपट बर्याच भाषेमध्ये पुन्हा तयार केला गेला आहे. बॉलिवूडच्या रिमेक "वॉन्टेड" मध्ये सलमान खानने अभिनय केला होता, तर "पोकरी" नावाच्या तमिळ आवृत्तीमध्ये विजय होता. कन्नड व बंग्लादेशातही याचा रिमेक झाला होता.
हेही वाचा - २० बेडचे कोविड रुग्णलय उभारणीसाठी अजय देवगणने केली मदत