महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

थ्रीडी 'रामायण'मध्ये राम-सीतेच्या भूमिकेत झळकणार महेश बाबू आणि दीपिका पदुकोण? - राम सीतेच्या भूमिकेत महेश बाबू आणि दीपिका

दक्षिण सुपरस्टार महेश बाबू आगामी 3 डी 'रामायणा'त भगवान रामची भूमिका साकारणार असल्यामुळे चर्चेत आहे. यात दीपिका पादुकोण सीतेच्या भूमिकेत आहे. दीपिकाची महाभारत या चित्रपटात द्रोपदीची भूमिकादेखील साकारणार आहे. द्रौपदीच्या दृष्टिकोनातून महाभारतची सहनिर्मिती करणारे मधु मन्तेना 'रामायण' या चित्रपटाचे चित्रण करीत आहेत.

Mahesh Babu to play Ram opposite Deepika i
महेश बाबू आणि दीपिका पदुकोण

By

Published : Feb 10, 2021, 7:28 PM IST

हैदराबाद- तेलुगू सुपरस्टार महेश बाबू याच्याकडे पौराणिक महाकाव्य 'रामायण' चित्रपटात राम ही व्यक्तीरेखा साकारण्यासाठी संपर्क साधला जात आहे. दीपिका पदुकोण सीताची भूमिका साकारणार असलेला थ्रीडी रामायण हा निर्माता मधु मन्तेनाचा महत्वाकांक्षी चित्रपट मानला जात आहे. हा चित्रपट करण्यासाठी निर्माते दक्षिणेतील मोठ्या कलाकाराचे नाव शोधत होते.

सीताच्या भूमिकेसाठी दीपिकाला निश्चित केल्यानंतर रावणच्या भूमिकेसाठी ह्रतिक रोशनची वर्णी लावण्यात निर्मात्यांना यश आलंय. त्यानंतर शोध सुरू झाला तो राम या महत्त्वाच्या भूमिकेसाठीचा. मुख्य भूमिका असलेल्या या व्यक्तीरेखेसाठीचा शोध तेलुगु सुपरस्टार महेश बाबू च्या नावावर थांबला आहे.

सीतेच्या भूमिकेत दीपिका पदुकोण

मधु मन्तेनाला रामच्या भूमिकेसाठी प्रभास हवा होता. मात्र ओम राऊत यांनी बाहुबली स्टार प्रभास आगामी आदिपुरुष या चित्रपटात राम ही व्यक्तीरेखा साकारणार असल्यामुळे त्याची निवड केली नाही. त्यानंतर निर्मात्यांनी महेश बाबूशी संपर्क साधला आहे. त्याला या चित्रपटाची कथा आवडली आहे. मात्र अद्याप महेश बाबूने या चित्रपटाला ग्रीन सिंगल दिलेला नाही.

एका वेबलॉईड अहवालानुसार, मधुला असे वाटते की श्री राम ही व्यक्तीरेखा साकारण्यासाठी महेश बाबूच्या चेहऱ्यावर असलेली निरागसता महत्त्वाची ठरू शकते. हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि महेश बाबू या तिन्ही स्टार्सचे 'क्वान' या टॅलेंट हंट एजन्सीशी संबंध असल्यामुळे महेश बाबू आणि दीपिका राम सीतेच्या भूमिकेत झळकण्याची शक्यता अधिक आहे.

महेश बाबूच्या आगामी कामाबद्दल बोलायचे तर तो २००८ मध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात सोभिता धुलीपालासुद्धा आहे.

हेही वाचा - 'लूप लपेटा’मधील ताहिर राज भसीनचा “रेट्रो गॉगल लूक” झाला प्रकाशित!

ABOUT THE AUTHOR

...view details