महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'ती नेहमी माझ्या पाठीशी असते', महेश बाबूने शेअर केला नम्रतासोबतचा फोटो - mahesh babu

महेश बाबू सध्या मुंबईत नम्रतासोबत फोटोशूटसाठी आलेला आहे. त्यातीलच काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. महेश बाबूने शेअर केलेल्या फोटोवर दिलेलं कॅप्शनही चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

'ती नेहमी माझ्या पाठीशी असते', महेश बाबूने शेअर केला नम्रतासोबतचा फोटो

By

Published : Sep 19, 2019, 12:03 PM IST

मुंबई -दाक्षिणात्य सूपरस्टार महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांची जोडी तेलुगू सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी मानली जाते. लग्नाच्या १४ वर्षानंतरही दोघांच्या जोडीची लोकप्रियता कमी झालेली नाही. अलिकडेच महेश बाबूने नम्रतासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवर सध्या चाहत्यांच्या भरभरुन प्रतिक्रिया येत आहेत.

महेश बाबू सध्या मुंबईत नम्रतासोबत फोटोशूटसाठी आलेला आहे. त्यातीलच काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. महेश बाबूने शेअर केलेल्या फोटोवर दिलेलं कॅप्शनही चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. ती नेहमी माझ्या पाठीशी असते, असं कॅप्शन त्याने या फोटोवर दिले आहे. या फोटोमध्येदेखील नम्रताची खास झलक पाहायला मिळते.

हेही वाचा -आयफा अवार्ड्स २०१९: आलिया सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर रणवीर ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

महेश बाबू आणि नम्रताची लव्हस्टोरी देखील एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच आहे. २००० साली 'वामसी' चित्रपटाच्या सेटवर त्यांची भेट झाली होती. त्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली. दोघांनाही सितारा आणि गौतम ही दोन मुले आहेत.

हेही वाचा -तयारीत रहा...'विक्की वेलिंगकर' येतेय तुमच्या भेटीला

ABOUT THE AUTHOR

...view details