महेश बाबू अभिनीत 'महर्षि' चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. महेश बाबू संपूर्ण ट्रेलरमध्ये पाहताना खूपच डॅशिंग आणि दिलखेच दिसत आहेत. ट्रेलरमध्ये, महेश बाबू अनेक लुकमध्ये दिसत असून चित्रपटात महेश बाबू एक कॉलेज विद्यार्थी 'ऋषी' च्या रुपात दिसेल. तसेच या चित्रपटात त्याच्या चॉकलेट बॉय लूकने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे.
शानदार सूटबूटमध्ये, एका सुंदर लोकेशनवर हेलिकॉप्टरमधून बाहेर येताना दिसत असून भरदार डायलॉग बोलताना प्रेक्षकांना प्रभावित करत आहे. केवळ एवढेच नाही तर महेश बाबूची या चित्रपटात दुहेरी भूमिका आहे. चित्रपट प्रभावशाली संवादाने भरलेला असेल.