मुंबई - बॉलिवूड अभिनेता संजय दत्त हा लवकरच राजकारणात एन्ट्री करणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षात तो प्रवेश करणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष मंत्री महादेव जानकर यांनी दिली आहे. मुंबईत आयोजित पक्षाच्या महामेळाव्यात त्यांनी याबद्दल माहिती दिली.
संजूबाबा करणार राजकारणात एन्ट्री, 'रासप'मध्ये प्रवेश करणार असल्याची महादेव जानकरांची माहिती - संजय दत्त
२५ सप्टेंबर रोजी संजय दत्तचा 'रासप' मध्ये प्रवेश होणार असल्याचे जानकर यांनी सांगितले.
संजूबाबा करणार राजकारणात एन्ट्री, 'रासप'मध्ये प्रवेश करणार असल्याची महादेव जानकरांची माहिती
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, २५ सप्टेंबर रोजी संजय दत्तचा 'रासप' मध्ये प्रवेश होणार असल्याचे जानकर यांनी सांगितले.
'संजय दत्त यांच्यासारखी माणसं आम्ही कव्हर करायला लागलो आहोत. फिल्म लाईनमध्ये देखील आम्ही बांधणी केली आहे', असेही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान संजय दत्तने देखील एक व्हिडिओ शेअर करुन रासपच्या वर्धापनदिनानिमित्त महादेव जानकरांना शुभेच्छा दिल्या आहेत.