महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सरोज खान यांच्या वाढदिवसानिमित्त 'धक धक गर्ल'च्या खास शुभेच्छा, पाहा व्हिडिओ - Madhuri Dixit and saroj khan songs

सरोज खान यांनी माधुरीच्या बऱ्याच गाण्यांना कोरिओग्राफ केलं आहे. प्रोफेशनल करिअरमध्येच नाही, तर वैयक्तिक आयुष्यातही त्याचं नात गुरू शिष्याचं आहे.

सरोज खान यांच्या वाढदिवसानिमित्त 'धक धक गर्ल'च्या खास शुभेच्छा, पाहा व्हिडिओ

By

Published : Nov 22, 2019, 5:14 PM IST

मुंबई -बॉलिवूडच्या दिग्गज कोरिओग्राफर सरोज खान यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी आजवर कोरिओग्राफ केलेली बरीच गाणी सुपरडुपरहिट ठरली आहेत. माधुरी दिक्षितच्याही बऱ्याच गाण्यांना त्यांनी कोरिओग्राफ केलं आहे. वैयक्तिक आयुष्यातही त्यांचं नात गुरू शिष्याचं आहे. त्यामुळे सरोज यांच्या वाढदिवसानिमित्त माधुरीने खास व्हिडिओ शेअर करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

'सरोज यांच्यासोबतचा आत्तापर्यंतचा प्रवास हा खुपच अविस्मरणीय आहे. त्यांच्या कल्पकतेवर मला खूप गर्व आहे. तुम्ही माझ्या गुरू आहात. तसेच माझ्या हृदयात तुमची नेहमी एक विशेष जागा कायम राहिल', असे लिहून माधुरीने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
सरोज खान यांच्या वाढदिवसानिमित्त 'धक धक गर्ल'च्या खास शुभेच्छा

हेही वाचा -अवघ्या २० दिवसात पूर्ण झालं 'विक्की वेलिंगकरचं' शूटिंग, सोनालीने शेअर केला अनुभव


सरोज खान यांनी बालपणीच कोरिओग्राफी क्षेत्रात एन्ट्री केली होती. १९७४ साली 'गीता मेरा नाम' या चित्रपटातील गाण्यांसाठी त्यांनी स्वतंत्र कोरिओग्राफी केली होती. त्यांनी आत्तापर्यंत २००० पेक्षा जास्त गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे. त्यांच्या कल्पक कोरिओग्राफीसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

हेही वाचा -'द बॉडी' चित्रपटातील दुसरं रोमॅन्टिक गाणं प्रदर्शित, पाहा इमरान हाश्मी- वेदिकाची केमेस्ट्री

ABOUT THE AUTHOR

...view details