मुंबई -बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दिक्षितने आजवर तिच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. आता अभिनयासोबतच तिने निर्मितीक्षेत्रात एन्ट्री घेतली आहे. तिचे पती डॉ. श्रीराम नेणे यांच्यासोबत मिळून माधुरी एका मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी माधुरी आणि तिच्या पतीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये माधुरी आणि श्रीराम नेणे आपल्या निर्मितीखाली तयार होणाऱ्या चित्रपटाचा क्लॅपबोर्ड दाखवताना पाहायला मिळतात.
'पंचक' असे या मराठी चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन जयंत जथर हे करणार आहेत. तर, अभिनेता आदिनाथ कोठारे यामध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
हेही वाचा - बहिणीची कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या भावाची गोष्ट, पाहा 'खारी- बिस्कीट'चा ट्रेलर