मुंबई -सध्या रियालिटी शोज प्रेक्षक-पाठिंबा मिळवत आहेत. 'डान्स दिवाने' चा सध्याच्या सीझनमध्ये उत्तम डान्स ॲक्शन होताना दिसतेय. स्पर्धकांनी त्यांचे पॉवर-पॅक परफॉर्मन्स, अविरत प्रतिभांसह सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे. दर आठवड्याला त्यांची नृत्याप्रती ‘दिवानगी’ पाहिल्यानंतर परीक्षक व अतिथी-सेलेब्रिटीदेखील थिरकण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीयेत. ‘डान्स दिवाने' या शोच्या परीक्षणाचे काम धर्मेश सर, तुषार कालिया आणि माधुरी दीक्षित पाहत आहेत.
माधुरी दीक्षित आणि जावेद जाफरी, ‘१०० महिन्यांनंतर’ आले एकत्र! - madhuri dixit and javed jafri
तीसेक वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘१०० डेज’ या चित्रपटात माधुरी आणि जावेद को-स्टार्स होते आणि हा चित्रपट सर्वांना आवडला होता. चित्रपटसृष्टीतील लोकांच्या भेटीगाठी होतंच असतात परंतु हे ‘१०० डेज’ चे हे दोन कलाकार तब्बल ‘१०० महिन्यानंतर’ भेटले. साहजिकच या भेटीचा आनंद दोघांनाही झाला होता आणि तो आनंद वाढण्याचे कारण म्हणजे ‘डान्स दिवाने’ च्या स्पर्धकांचे नृत्यप्रदर्शन.
![माधुरी दीक्षित आणि जावेद जाफरी, ‘१०० महिन्यांनंतर’ आले एकत्र! 100 days](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12186356-653-12186356-1624066991497.jpg)
100 days