मुंबई -अभिनेत्री करिश्मा कपूर आज तिचा ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. करिश्माने बॉलिवूडमध्ये बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 'धक धक गर्ल' माधुरीसोबतही तिने 'दिल तो पागल है' या चित्रपटात भूमिका साकारली होती. तिच्या वाढदिवसानिमित्त माधुरीने सोशल मीडियावर करिश्माला खास शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या चित्रपटातील खास आठवणही तिने शेअर केली आहे.
करिश्मा कपूरच्या वाढदिवसानिमित्त 'धक धक गर्ल'ने दिला 'या' चित्रपटाच्या आठवणींना उजाळा - dance off scene
तिच्या वाढदिवसानिमित्त माधुरीने सोशल मीडियावर करिश्माला खास शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या चित्रपटातील खास आठवणही तिने शेअर केली आहे.
करिश्मा कपूरच्या वाढदिवसानिमित्त 'धक धक गर्ल'ने दिला 'या' चित्रपटाच्या आठवणींना उजाळा
करिश्मा कपूर, माधुरी दिक्षीत आणि शाहरुख खान या तिघांचाही 'दिल तो पागल है' हा चित्रपट फार गाजला होता. या चित्रपटात एका सीनमध्ये माधुरी आणि करिश्माच्या डान्सची जुगलबंदी दाखवण्यात आली होती. याच आठवणीला माधुरीने उजाळा दिला आहे.
करिश्मा तिचा वाढदिवस इंग्लंडला साजरा करत आहे. तिने तिच्या कुटुंबीयांसोबतचे काही फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तर, माधुरी दिक्षीतही तिच्या कुटुंबासोबत इटलीतील रोम येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.