पुणे - दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी आपल्या 'इंदू सरकार' या चित्रपटाची प्रिंट पुण्याच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला सूपूर्त केली आहे. १९७५ ते १९७७ या काळात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवरील हा चित्रपट होता. हा चित्रपट इंदिरा गांधीचा बायोपिक नव्हे तर एक राजकीय चित्रपट असल्याचे मधुर यांनी सांगितले.
मधुर भांडारकरांनी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला सूपूर्त केला 'इंदू सरकार' - NFAI
मधुर भांडारकरांचा इंदू सरकार हा चित्रपट आता पुण्याच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात उपलब्ध झाला आहे. यापूर्वीही त्यांचे 'चांदनी बार', 'पेज ३', 'कार्पोरेट', 'जेल', 'ट्राफिक सिग्नल' आणि 'फॅशन' हे चित्रपट या संग्रहालयाला बहाल केले आहेत.
मधुर भांडारकर
'इंदू सरकार' या चित्रपटात किर्ती कुल्हारी, तोता रॉय चौधरी, नील नितीन मुकेश, सुप्रिया विनोद, अनुपम खेर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मधुर भांडारकरांनी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला दिलेला हा पहिला चित्रपट नाही. यापूर्वी त्यांचा 'चांदनी बार', 'पेज ३', 'कार्पोरेट', 'जेल', 'ट्राफिक सिग्नल' आणि 'फॅशन' हे चित्रपट या संग्रहालयाला बहाल केलेले आहेत.
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ही माहिती आपल्या ट्विटरवरुन दिली आहे.