मुंबई- कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉनच्या मुख्य भूमिका असलेला 'लुका छुपी' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. लग्नाआधी एकमेकांना समजून घेण्यासाठी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा अट्टहास करणारी रश्मी म्हणजेच क्रिती आणि तिच्या हट्टापायी दोघांची होणारी फजिती प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळते. तुम्हालाही हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता असणार मात्र, चित्रपट पाहायला जाण्याआधी जाणून घ्या, या चित्रपटाविषयी खास..
FILM REVIEW: हसायला भाग पाडणारी गुड्डू अन् रश्मीची लिव्ह इन लव्हस्टोरी - kartik aaryan
लव्हस्टोरीसोबतच कॉमेडीचा टच असलेला हा चित्रपट प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा आहे.
गुड्डू म्हणजेच कार्तिक आर्यन चित्रपटात एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाच्या भूमिकेत आहे. तर रश्मी म्हणजेच क्रिती उच्चशिक्षित आणि बिनधास्त, अशी एक मुलगी. रश्मीचे वडील कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे नेते असतात. ज्यांना प्रेमीयुगुलांनी भेटणे मान्य नाही. गुड्डू-रश्मीला लग्नाची मागणी घालतो. मात्र मॉडर्न विचारांची रश्मी लग्नाच्या जबाबदारीसाठी तयार नसल्याने एकमेकांना चांगल्या रितीने समजून घेण्यासाठी गुड्डूसमोर लिव्ह इन रिलेशनशिपचा प्रस्ताव ठेवते आणि दोघेही लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतात. यातूनच पुढे होणारी दोघांची फजिती पाहायला मिळते.
लव्हस्टोरीसोबतच कॉमेडीचा टच असलेला हा चित्रपट प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कार्तिक आणि क्रिती पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसले असले तरीही त्यांची चित्रपटातील केमिस्ट्री प्रेक्षकांची मने जिंकते. या दोघांची लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची गोष्ट घरच्यांपासून लपवण्याची धडपड आणि या दरम्यान घडणाऱ्या अनेक विवोदी प्रसंगांनी चित्रपटात एक वेगळीच रंगत आणली आहे. लक्ष्मण उटेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.