मुंबई - बॉलिवूड अभिनेता सनी कौशलने सांगितलंय की त्याच्या आगामी 'हुडदंग' चित्रपटातील त्याचा लूक नव्वदच्या दशकातील हिंदी चित्रपटाच्या नायकांसारखा असेल.
सनी म्हणाला, "जवळपास एक वर्षानंतर दद्दू ठाकूरच्या भूमिकेत परत येणे ही मजेशीर गोष्ट आहे. (लॉकडाऊनमुळे शूटिंग थांबविण्यात आले होते.) व्यक्तीरेखेचा लूक यात खूप महत्त्वाचा आहे. कारण हा चित्रपट १९९० वर आधारित आहे आणि मी अनिल कपूर यांचा फार मोठा चाहता आहे. दद्दूच्या लूकसाठी 'तेजाब' आणि 'राम लखन' यापासून प्रेरणा घेतली आहे.''