नवी दिल्ली - 'सच अ पॉझिटीव्ह अॅटीट्यूड' अशा शब्दात महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांची नात नव्या नवेली नंदाचे कौतूक केले. नव्याने बुधवारी तिचा पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. नव्याने न्यूयॉर्कमधून पदवी पूर्ण केली.लॉकडाऊनमुळे पदवीदान समारंभ रद्द करण्यात आल्याचेही बिग बी यांनी ट्विटरवर सांगितले.
मात्र, नव्याला पदवीदान समारंभासाठी गाऊन आणि कॅप घालण्याची फार इच्छा होती. ही इच्छा तिने घरीच पूर्ण केली. किती हा पॉझिटीव्ह अॅटीट्यूड अशा शब्दांत बिग बींनी नातीचे कौतूक केले.
बिग बींनी ट्विटरवर नव्याचा स्लो मोशन व्हिडिओ शेअर केला. तसेच दुसऱ्या पोस्टमध्ये तिचे काही फोटो शेअर केले. नव्या गाऊन आणि कॅप घालून आई श्वेता बच्चन नंदासोबत या फोटोत दिसत आहे.
दुसरीकडे, नव्याच्या घरातील पदवीदान सोहळ्यासाठी गाऊन आणि कॅप कसा बनविला, याबद्दल श्वेता बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर माहिती दिली. त्यांनी घरातच कॅप आणि गाऊन बनविल्याचे श्वेता यांनी सांगितले. चार्ट पेपरपासून कॅप तयार केली. तर घरातीलच एका कपड्यापासून हाताने शिवून गाऊन तयार करण्यात आला होता.
'अभिनंदन बेटा...मला तुझा खूप अभिमान वाटतो..आय लव्ह यू' असे छान कॅप्शन श्वेता बच्चन नंदा यांनी पोस्टला दिले असून नव्याचे काही फोटो शेअर केले आहेत.