मुंबई - बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटात अक्षय कुमार तृतीयपंथीच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री कियारा आडवाणीचीही या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. कियाराने शूटिंगच्या शेवटच्या दिवशीचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीमध्ये शेअर केला आहे.
कियाराने शेअर केलेला हा फोटो चित्रपट निर्माती शबिना खान यांनी पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये अक्षय कुमारसह चित्रपटाच्या टीमचा समावेश आहे.
अभिनेता तुषार कपूर यानेदेखील एक फोटो शेअर केला आहे. तो या चित्रपटाचा सहनिर्माता आहे. तसेच, त्याने या चित्रपटात भूमिका देखील साकारली आहे. अक्षय कुमार, कियारा आडवाणीसोबतच शरद केळकर, अश्विनी कळसेकर आणि तरुण अरोरा यांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत.