महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

राणू मंडलबाबत लतादीदींनी दिली प्रतिकिया, म्हणाल्या 'माझी गाणी गात रहा, पण....' - हिमेश रेशमिया

रेल्वे स्थानकावर लता मंगेशकरांचं 'एक प्यार का नगमा' हे गाणं गाऊन राणू या रातोरात इंटरनेटवर स्टार झाल्या. काहींनी तर त्यांच्या आवाजाला थेट लतादीदींच्या आवाजाची उपमा दिली.

राणू मंडलबाबत लतादिदींनी दिली प्रतिकिया, म्हणाल्या 'माझी गाणी गात रहा, पण....'

By

Published : Sep 3, 2019, 9:41 PM IST

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या झोतात आलेलं नाव म्हणजे राणू मंडल. रेल्वे स्थानकावर लता मंगेशकरांचं 'एक प्यार का नगमा' हे गाणं गाऊन राणू या रातोरात स्टार झाल्या. काहींनी तर त्यांच्या आवाजाला थेट लतादीदींच्या आवाजाची उपमा दिली. शिवाय, हिमेश रेशमियाने दिलेल्या संधीमुळेही राणू प्रसिद्ध झाल्या. आता यावर गानकोकीळा लता मंगेशकर यांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया आली आहे.

एका माध्यमाशी बोलताना लतादीदींनी राणूबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'माझ्या गाण्यांमुळे कोणाचे भले होत असेल तर त्यात मला आनंदच आहे. परंतु, इतर मोठ्या कलाकारांची गाणी गाऊन तुम्हाला ठराविक काळासाठी प्रसिद्धी मिळेल. मात्र, त्यात नवनिर्मितीक्षमता नसल्यास ती प्रसिद्धी फार काळ टिकू शकत नाही', असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा-हिमेश रेशमियाच्या 'या' गाजलेल्या गाण्याला राणू मंडलचा स्वरसाज, रेकॉर्ड केलं तिसरं गाणं

'अनेक मुले रिअ‍ॅलिटी शोमध्ये गातात. मात्र, सुरुवातीच्या यशानंतर त्यांना कोण लक्षात ठेवतो? सध्या मला फक्त सुनिधी चौहान आणि श्रेया घोषाल हीच नावे माहीत आहेत. त्यामुळे इतरांची गाणी जरूर गा. मात्र, ठराविक वेळानंतर त्यात स्वतःचेही काही द्या', असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

पुढे त्या आशा भोसले यांचे उदाहरण देताना म्हणाल्या, की 'आज आशाने स्वतःच्या गाण्यांची वेगळी ओळख निर्माण केली. म्हणून, ती यशस्वी ठरू शकली. नाही तर माझी सावली म्हणून ती राहिली असती'.

हेही वाचा-हुबेहुब श्रीदेवी... मेणाच्या पुतळ्याचे बुधवारी अनावरण, पाहा एक झलक

दरम्यान, नुकतेच हिमेश रेशमियासोबत रानू मंडल यांनी त्यांचे तिसरे गाणे रेकॉर्ड केले आहे. यादरम्यान त्यांनी काही रिअ‍ॅलिटी शोजमध्येही हजेरी लावली. तसेच त्यांच्याकडे आता बऱ्याच ऑफर्स येऊ लागल्या आहेत. एका व्हायरल व्हिडिओमुळे राणूचे नशीब पूर्णत: बदलले आहे. त्यामुळे त्यांचा प्रवासही थक्क करणारा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details