मुंबई - गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती आता स्थिर असल्याच कळत आहे. रविवारी (१० नोव्हेंबर) मध्यरात्री अचानक त्यांना श्वासोच्छवास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं.
लतादीदींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर तातडीने अतीदक्षता विभागात भरती करण्यात आलं होतं. त्यांची काळजी घेण्यासाठी आशा भोसले आणि उषा मंगेशकर या रुग्णालयात आल्या आहेत. सध्या आशाताई, उषाताई, आदिनाथ मंगेशकर त्यांची काळजी घेत आहेत.