महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बॉलिवूडच्या चित्रपटांची ‘प्रदर्शन-घाई’, रसिक मायबाप ठरवणार भवितव्य! - बॉलिवूडच्या चित्रपटांची ‘प्रदर्शन-घाई

नुकतीच महाराष्ट्र शासनाने चित्रपटगृहे उघडण्याची परवानगी दिली असून त्यामुळे ‘लगीन-घाई’ प्रमाणे अनेक चित्रपटांची ‘प्रदर्शन-घाई’ झालेली दिसतेय. त्यातच कोरोनाचा कहर कमी झाल्यामुळे अनेक चित्रपट निर्माते प्रेक्षक सिनेगृहांत येतील अशी आशा बाळगून आहेत. त्यातच मोठमोठे सणवार येत असून त्यावेळी प्रेक्षकांना सिनेमागृहात आणण्याची तयारी होताना दिसतेय. येत्या २२ ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत पडदा पुन्हा उजळणार आहे.

प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेले चित्रपट
प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेले चित्रपट

By

Published : Sep 30, 2021, 5:02 PM IST

कोरोना महामारीमुळे अनेक लॉकडाऊन लागले आणि सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी सार्वजनिक गर्दी होणाऱ्या जागांना टाळे बसले. लोकल ट्रेन्स, मंदिरं, रेस्टॉरंट्स, मॉल्स आणि थिएटर्ससुद्धा अनादी काळासाठी बंद ठेवण्यात आली आहेत/होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाला असे वाटल्यामुळे बऱ्याच राज्यांमध्ये चित्रपटगृहे उघडली गेली परंतु महाराष्ट्रासकट काही राज्यांमध्ये ती बंदच ठेवण्यात आली होती. बरेच चित्रपट महाराष्ट्र वगळता अनेक राज्यांत प्रदर्शित झाले परंतु सर्व चित्रकर्मी महाराष्ट्रातील, खासकरून मुंबईतील, चित्रपटगृहे उघडण्याच्या प्रतीक्षेत होते.

प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेले चित्रपट

नाही म्हणायला या वर्षाच्या सुरुवातीला मल्टिप्लेक्स सुरु झाली होती परंतु ५०% क्षमतेनेच, ज्यांना पुन्हा टाळे लागले होते. खरंतर बॉलिवूड चित्रपटाला मिळणाऱ्या मुंबईतील प्रतिसादाला मान देते त्यामुळे अनेक ‘बडे’ चित्रपट वर्ष-दोन वर्षांपासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत होते. नुकतीच महाराष्ट्र शासनाने चित्रपटगृहे उघडण्याची परवानगी दिली असून त्यामुळे ‘लगीन-घाई’ प्रमाणे अनेक चित्रपटांची ‘प्रदर्शन-घाई’ झालेली दिसतेय. त्यातच कोरोनाचा कहर कमी झाल्यामुळे अनेक चित्रपट निर्माते प्रेक्षक सिनेगृहांत येतील अशी आशा बाळगून आहेत. त्यातच मोठमोठे सणवार येत असून त्यावेळी प्रेक्षकांना सिनेमागृहात आणण्याची तयारी होताना दिसतेय. येत्या २२ ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत पडदा पुन्हा उजळणार आहे.

प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेले चित्रपट

अनेक चित्रपटांची प्रदर्शन वेळापत्रकं बदलली गेली परंतु ‘देर आये दुरुस्त आये’ म्हणत निर्माते आणि निर्मितीसंस्था आपापल्या चित्रपटांच्या रिलीज डेट्स धडाधड जाहीर करीत आहेत. अक्षय कुमार, कतरीना कैफ, रणवीर सिंग आणि अजय देवगण यांच्या भूमिका असलेला, रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ येत्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. खरंतर तो गेल्यावर्षी मार्चमध्ये, कोरोना आघाताआधी, प्रदर्शनासाठी सज्ज झालेला होता. सूर्यवंशी प्रमाणेच रणवीर सिंग अभिनित आणि कबीर खान दिग्दर्शित ‘८३’ हा सिनेमासुद्धा गेल्यावर्षीच प्रदर्शित होणार होता परंतु आता तो येत्या नाताळात २५ डिसेंबरला प्रदर्शित होईल.

प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेले चित्रपट

जॉन अब्राहाम चा डबल रोल असलेला ‘सत्यमेव जायते २’ २६ नोव्हेंबर ला प्रदर्शित होईल तर यशराज फिल्म्सचा ‘बंटी और बबली २’ १९ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. तेलगू चित्रपट ‘RX 100’ चा रिमेक असलेला आणि अहान शेट्टी व तारा सुतारीया यांच्या भूमिका असलेला साजिद नाडियादवाला निर्मित ‘तड्प’ ३ डिसेंबर ला प्रदर्शित होईल. नाडियादवाला ग्रॅन्डसन्स निर्मित, शाहिद कपूर ची प्रमुख भूमिका असलेला जर्सी ३१ डिसेंबर ला, अक्षय कुमार, क्रिती सॅनन व जॅकलिन फेर्नांडीस अभिनित ‘बच्चन पांडे’ ४ मार्च २०२२ तर ‘हिरोपंती २’, ज्यात टायगर श्रॉफची प्रमुख भूमिका आहे, प्रदर्शित होईल ६ मे २०२२ ला.

प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेले चित्रपट

आयुष्मान खुराना चा ‘चंदीगड करे आशिकी’ १० डिसेंबर, अक्षय कुमार अभिनित यशराज फिल्म्स चा ‘पृथ्वीराज’ २१ जानेवारी २०२२, रणवीर सिंग चा यशराज फिल्म्स निर्मित ‘जयेशभाई जोरदार’ २५ फेब्रुवारी २०२२ ला रिलीज होतील. रणबीर कपूर जवळपास तीनेक वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसेल ‘शमशेरा’ मधून जो प्रदर्शित होणार आहे, १८ मार्च २०२२ ला. कार्तिक आर्यन चा ‘भूल भुलैया २’ प्रदर्शित होईल २५ मार्च २०२२ ला तर अजय देवगण दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन अभिनित ‘मे डे’ पुढील वर्षी २९ एप्रिल ला सिनेमाघरांत झळकेल. आनंद एल राय दिग्दर्शित व अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला ‘रक्षाबंधन’ ११ ऑगस्ट २०२२ ला आणि मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ रिलीज होईल ११ ऑगस्ट २०२२ लाच. ‘राम सेतू’ ने पुढील वर्षाची दिवाळी बूक केली असून, टायगर श्रॉफ चा ‘गणपत’ पुढच्या नाताळात येणार आहे.

प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेले चित्रपट

आमिर खान चा ‘लाल सिंग चड्ढा’ गेल्या ख्रिसमस ला येणार होता व नंतर कोरोना मुळे त्याचे प्रदर्शन २०२१ च्या नाताळात ढकलले गेले होते. परंतु आता तो पुढील वर्षी ‘व्हॅलेंटाईन डे’ ला प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूडकर चित्रपटांच्या ‘प्रदर्शन-घाई’ मध्ये अडकले असले तरी सामान्य प्रेक्षक थियेटरमध्ये कितपत जाण्यास धजेल हे येणारा काळच सांगेल.

प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेले चित्रपट

हेही वाचा - रणबीर आलियाच्या जोधपूर सहलीचे फोटो, जोडप्याने इथे घालवले खास क्षण

ABOUT THE AUTHOR

...view details