मुंबई -मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. अॅसिड हल्ल्यातून बचावलेली पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिची प्रेरणादायी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. दीपिका पदुकोणची यामध्ये मूख्य भूमिका आहे. चित्रपटाच्या ट्रेलरनंतर यातील गाणी देखील प्रदर्शित करण्यात येत आहेत. अलिकडेच या चित्रपटाचे टायटल ट्रॅक रिलीज करण्यात आले. या गाण्याच्या लॉन्चिगदरम्यान लक्ष्मी अग्रवालला अश्रू अनावर झाले होते.
हेही वाचा -अथिया-केएल राहुलच्या नात्यावर सुनील शेट्टींनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया
‘छपाक’चं टायटल साँग 'कोई चेहरा' च्या रिलीजवेळी मेघना गुलजार, दीपिका पदुकोण, लक्ष्मी अग्रवाल, शंकर महादेवन, विक्रांत मेस्सी यांनी हजेरी लावली होती. यावेळी शंकर महादेवन यांनी हे गाणं लाइव्ह गायलं. यावेळी स्टेजवर उपस्थित असलेली लक्ष्मी अग्रवाल भावूक झालेली दिसली. दीपिकाने यावेळी तिला आधार दिला.