महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सिद्धार्थ जाधवच्या 'लग्नकल्लोळ'चे चित्रीकरण सुरू, अब्बास-मस्तान यांची हजेरी - abbas mastani

लग्नानंतरचे सुगीचे, आनंदाचे, असे नव्याचे नऊ दिवस संपले की, सुरुवात होते ती खऱ्या आयुष्याला. सामान्य माणसापासून ते नावाजलेल्या व्यक्तीपर्यंत सर्वच लोक हे या अनुभवातून जातात

सिद्धार्थ जाधवच्या 'लग्नकल्लोळ'चे चित्रीकरण सुरू

By

Published : May 11, 2019, 7:58 AM IST

मुंबई- लग्न हे एक सुंदर कोडं आहे. दिसायला कितीही सोपं असलं तरी जितकं सोडवू तितकं कमीच. लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण असतो. लग्नानंतरचे सुगीचे, आनंदाचे, असे नव्याचे नऊ दिवस संपले की, सुरुवात होते ती खऱ्या आयुष्याला. सामान्य माणसापासून ते नावाजलेल्या व्यक्तीपर्यंत सर्वच लोक हे या अनुभवातून जातात. याच संकल्पनेवर आधारित 'लग्नकल्लोळ' हा धमाल विनोदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


चित्रपटात सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान, मयुरी देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नुकतंच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा मुंबईतील सेंट रेजीस येथे दिमाखात पार पडला. यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक अब्बास - मस्तान यांनी चित्रपटाची घोषणा केली. तर विनोदाचे बादशाह जॉनी लिवर यांनी चित्रपटाला पहिली क्लॅप दिली. याप्रसंगी अब्बास - मस्तान यांनी या चित्रपटाला शुभेच्छा देताना 'हसणे हे एक उत्तम औषध असल्यामुळे नेहमी सर्वांनी हसत राहावे. तुम्हाला हसत ठेवण्यासाठीच 'लग्नकल्लोळ' हा धमाल विनोदी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे म्हटले आहे.

सिद्धार्थ जाधवच्या 'लग्नकल्लोळ'चे चित्रीकरण सुरू

मयूर तिरमखे फिल्म्स निर्मित आणि मोहम्मद बर्मावाला दिग्दर्शित 'लग्नकल्लोळ' हा चित्रपट येत्या काही महिन्यांत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मोहम्मद बर्मावाला यांनी यापूर्वी दिग्दर्शक अब्बास -मस्तान यांच्यासोबत सुमारे तीन दशके काम केले आहे. त्यांनी बाजीगर, बादशाह आणि रेस आणि अशा अनेक सुपरहिट चित्रपटांसाठी सह-दिग्दर्शक आणि कार्यकारी निर्माता म्हणून काम पहिले आहे.

लग्नकल्लोळ या चित्रपटात भारत गणेशपुरे, प्रिया बेर्डे, प्रतीक्षा लोणकर, सुप्रिया कर्णिक, विद्या करंजीकर, अमिता कुलकर्णी, संतोष तिरमखे आणि डॉ. आशिष गोखले हे कलाकारदेखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

सिद्धार्थ जाधवच्या 'लग्नकल्लोळ'चे चित्रीकरण सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details