मुंबई -अभिनेता कुणाल कपूर आणि त्याची पत्नी नयना बच्चन यांना मुलगा झाला आहे. सोमवारी कुणालने इंस्टाग्रामवर आपल्या फॉलोअर्ससोबत ही आनंदाची बातमी शेअर केली. कुणाल आणि नैना यांनी २०१५ मध्ये सेशेल्समध्ये एका खाजगी कौटुंबिक समारंभात लग्न केले.
कुणाल कपूर यांनी आपल्याला मुलगा झाल्याचे इंस्टाग्रामवर सांगितले. कुणालने रंग दे बसंती, आजा नचले आणि लव शुव ते चिकन खुराना यांसारख्या चित्रपटात काम केले होते. "आमच्या सर्व शुभचिंतकांना, नैना आणि मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की आम्ही एका सुंदर मुलाचे पालक बनलो आहोत. यासाठी आम्ही देवाचे आभार मानतो," अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.
सुझॅन, श्वेताने दिल्या शुभेच्छा
नवजात मुलाच्या आगमनाची बातमी समजल्यानंतर चाहत्यांनी आणि चित्रपटसृष्टीतील सदस्यांनी कुणाल आणि नैना यांच्यासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या. "सर्वात मोठे अभिनंदन कुणाल आणि नयना तुम्ही एका मुलाचे पालक झाले आहात," अशी कमेंट करत सुझॅन खानने शुभेच्छा दिल्या. तर नयनाची चुलत बहीण आणि अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन हिने “तुम्हा सर्वांवर प्रेम आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
2015 मध्ये केले होते लग्न
कुणाल आणि नैना यांनी 2015 मध्ये सेशेल्समध्ये एका खाजगी कौटुंबिक समारंभात लग्न केले. नयना, एक इन्व्हेस्टमेंट बँकर असून अमिताभ बच्चन यांचे धाकटा भाऊ अजिताभ आणि रमोला बच्चन यांची मुलगी आहे. कुणाल शेवटचा 2021 च्या अनकही कहानिया या नेटफ्लिक्सच्या सिरीजमध्ये दिसला होता.
हेही वाचा -मौनी रॉयचा सासरी गृहप्रवेश, पाहा व्हिडिओ