मुंबई - संगीत जगतातील नावाजलेलं नाव म्हणजे कुमार सानू. आज बरेच गायक बॉलिवूडमध्ये आहेत. मात्र, त्यापैकी काहीच असे आहेत ज्यांचा आवाज प्रेक्षकांच्या मनात वर्षानुवर्षापासून रुजलेला आहे. कुमार सानू हे देखील यापैकीच एक. ९० च्या दशकात कुमार सानू यांच्या आवाजाची बॉलिवूडमध्ये दमदार छाप होती. उदित नारायण आणि अभिजीत यांसारख्या दिग्गज गायकांच्या काळात कुमार सानू यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी गायलेल्या रोमॅन्टिक गाण्यांची क्रेझ आजही पाहायला मिळते.
कुमार सानू यांचा जन्म २३ सप्टेंबर १९५७ साली कोलकाता येथे झाला होता. त्यांचे वडील पशुपति भट्टाचार्य हे देखील प्रसिद्ध संगीतकार होते. त्यामुळे संगीताचं बाळकडू त्यांना बालपणीच मिळालं. ज्यावेळी कुमार सानू यांनी संगीत क्षेत्रात पदार्पण केलं त्यावेळी किशोर कुमार यांचीही क्रेझ होती. मात्र, त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रात पोकळी निर्माण झाली. अशात कुमार सानू यांनी आपल्या आवाजानं ही पोकळी भरुन काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांनी गायलेल्या रोमॅन्टिक गाण्यांबद्दल...
'मेरा दिल भी कितना पागल है'
'साजन' चित्रपटातील 'मेरा दिल भी' हे गाणं आजही लोकप्रिय आहे. कुमार सानूसोबत अलका याज्ञिक यांनी हे गाणं गायलं होतं.