महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

क्रिती खरबंदाच्या जागी 'चेहरे' चित्रपटात दिसणार 'ही' टीव्ही अभिनेत्री - Chehre film release date

क्रितीने 'हाऊसफुल ४' चित्रपटादरम्यान 'चेहरे' चित्रपटातून माघार घेतली होती. निर्माते आणि तिच्यामध्ये काही कारणावरून वाद झाल्याने तिने हा चित्रपट सोडला, असेही बोलण्यात आले.

Krystle D'souza replace Kriti kharbanda in Chehre film
क्रिती खरबंदाच्या जागी 'चेहरे' चित्रपटात दिसणार 'ही' टीव्ही अभिनेत्री

By

Published : Dec 5, 2019, 9:20 AM IST

मुंबई - महानायक अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी दोघेही आगामी 'चेहरे' या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने इमरान पहिल्यांदाच बिग बींसोबत पडद्यावर दिसणार आहे. त्यांचे फर्स्ट लूकही काही दिवसांपूर्वी समोर आले. अभिनेत्री क्रिती खरबंदाचीही वर्णी या चित्रपटासाठी लागली होती. मात्र, क्रितीने या चित्रपटातून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे तिच्या जागी आता एका सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीची वर्णी लागली आहे.

बॉलिवूडमध्ये आत्तापर्यंत बऱ्याच टीव्ही मालिकेतील अभिनेत्रींनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'एक हजारो मे मेरी बहन है' फेम क्रिस्टल डिसुजा देखील आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. क्रितीच्या जागी 'चेहरे' चित्रपटात तिची महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळले.

हेही वाचा -'जयेशभाई जोरदार' म्हणत रणवीर सिंग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, फर्स्ट लूक रिलीज


क्रितीने 'हाऊसफुल ४' चित्रपटादरम्यान 'चेहरे' चित्रपटातून माघार घेतली होती. निर्माते आणि तिच्यामध्ये काही कारणावरून वाद झाल्याने तिने हा चित्रपट सोडला, असेही बोलण्यात आले. मात्र, क्रितीने तिच्या वैयक्तिक कारणामुळे हा चित्रपट सोडला, असे निर्मात्यांनी स्पष्ट केले. आता तिची भूमिका क्रिस्टल साकारणार असल्यामुळे, छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

रूमी जाफरी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर, आनंद पंडित हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. पुढच्या वर्षी २४ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

हेही वाचा -आमिर खानने 'पानिपत' टीमला दिल्या यशासाठी सदिच्छा

ABOUT THE AUTHOR

...view details