मुंबई -अभिनेत्री क्रिती सेनॉन आज २९ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्यावर कलाविश्वातून तसेच चाहत्यांचा शुभेच्छा वर्षाव होत आहे. क्रितीने तिच्या बहिणीसोबत तिच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले आहे. तिच्या या सेलिब्रेशनचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
क्रितीची बहीण नुपुर सेनॉन आणि दिग्दर्शक मुकेश छाबरा या दोघांनी तिच्या वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. नुपुरनेही क्रितीचा एक व्हिडिओ शेअर करुन सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.