मुंबई - बॉलिवूड निर्माता करण जोहर यांनी ब्रम्हास्त्र टीमच्या वेतनात कपात करणार असल्याच्या बातमीचे खंडन केले आहे. लॉकडाऊनमुळे त्यांचा आगामी ब्रम्हास्त्र हा चित्रपट अडकला आहे. त्यामुळे यावर काम करणाऱ्या कलाकार आणि तंत्रज्ञांच्या पगारात कपात केली असल्याची अफवा पसरली आहे. यावर करण यांनी आपले मत मांडले.
कोणत्याही निष्कर्षाला पोहोचण्यापूर्वी अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी असा सल्लाही त्यांनी अफवा पसरवणाऱ्यांना दिला आहे.
अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रम्हास्त्र या आगामी चित्रपटात अमिताभ बच्चन, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर याच्यासारखे प्रसिध्द कलाकार भूमिका करीत आहेत. यात नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.