महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अभिनेत्री किमच्या लग्नाला सहा वर्ष पूर्ण, शेअर केला पतीसोबतचा फोटो - Kim Kardashian posts adorable pic

किमने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती आपल्या पतीच्या गालावर किस करताना दिसत आहे. 6 वर्षं उलटली आणि शेवटच्या क्षणापर्यंत हा प्रवास असाच राहील, असे कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोला दिले आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टला चाहते आणि मित्रांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. सोबतच अनेकांनी या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत.

Kim Kardashian celebrates wedding anniversary
अभिनेत्री किमच्या लग्नाला सहा वर्ष पूर्ण

By

Published : May 25, 2020, 2:59 PM IST

मुंबई - हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दशियन नेहमीच आपल्या निरनिराळ्या फोटोंमुळे चर्चेत असते. रविवारी किम आणि तिचा रॅपर पती कान्ये वेस्ट यांच्या लग्नाचा सहावा वाढदिवस होता. यानिमित्त किमने पतीसोबतचा आपला एक खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला.

किमने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती आपल्या पतीच्या गालावर किस करताना दिसत आहे. 6 वर्षं उलटली आणि शेवटच्या क्षणापर्यंत हा प्रवास असाच राहील, असे कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोला दिले आहे.

अभिनेत्रीच्या या पोस्टला चाहते आणि मित्रांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. सोबतच अनेकांनी या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टरवर किमची बहीण खोले हिने 'दीर्घायुष्य लाभो', अशी प्रतिक्रिया दिली आहे. किम आणि कान्ये यांना चार मुले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details