मुंबई -बॉलिवूडचा भाईजान सलमान खान 'चुलबुल पांडे'च्या रुपात 'दबंग ३'मधुन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचं अलिकडेच शूटिंग पूर्ण झालं आहे. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर सलमानने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या चित्रपटातील सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर यांचा फर्स्ट लूक यापूर्वीच प्रदर्शित झाला आहे. आता या चित्रपटातील विलन अभिनेता किच्चा सुदीप याचाही लूक शेअर करण्यात आला आहे.
होय, दाक्षिणात्य सुपरस्टार किच्चा सुदीप 'दबंग ३'मध्ये विलनच्या भूमिकेत झळकणार आहे. त्याचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
'दबंग'मध्ये विलनची भूमिका सोनू सुद, 'दबंग २'मध्ये प्रकाश राज यांनी साकारली होती. तर, आता 'दबंग ३'मध्ये किच्ची सुदीप विलन साकारणार आहे.
प्रभू देवा या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. तर, अरबाज खान निर्मिती करत आहे. २० डिसेंबरला हा चित्रपट सिनेमागृहात झळकणार आहे.