महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कियारा आडवाणीच्या 'इंदु की जवानी'चं शूटिंग पूर्ण - Kiara advani wraps up shooting

कियाराने तिच्या संपूर्ण टीमसोबत या क्षणाचा आनंद साजरा केला. त्याचा व्हिडिओ देखील तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

कियारा आडवाणीच्या 'इंदु की जवानी'चं शूटिंग पूर्ण, सेलिब्रेशनचा व्हिडिओ केला शेअर

By

Published : Nov 22, 2019, 7:49 PM IST

Updated : Nov 22, 2019, 7:58 PM IST

मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी ही 'कबिर सिंग' चित्रपटानंतर प्रसिद्धी झोतात आली आहे. या चित्रपटानंतर तिची बऱ्याच चित्रपटांमध्ये वर्णी लागली आहे. काही दिवसांपूर्वीच तिची भूमिका असलेल्या 'गुड न्यूज' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानंतर ती 'इंदु की जवानी' या चित्रपटामध्ये झळकणार आहे. नुकतेच तिने या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले.

कियाराने तिच्या संपूर्ण टीमसोबत या क्षणाचा आनंद साजरा केला. त्याचा व्हिडिओ देखील तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा -'द बॉडी' चित्रपटातील दुसरं रोमॅन्टिक गाणं प्रदर्शित, पाहा इमरान हाश्मी- वेदिकाची केमेस्ट्री


बंगाली दिग्दर्शक तसेच लेखक असलेले अबीर सेनगुप्ता यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ते हिंदी सिनेसृष्टीत दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत.

'इंदु की जवानी'चं शूटिंग पूर्ण

आदित्य सील आणि मल्लिका दुआ यांच्यादेखील यामध्ये भूमिका पाहायला मिळणार आहेत. निरंजन अयंगर आणि रेयान स्टीफन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.चित्रपटाबाबत सांगायचं झालं तर, कियारा या चित्रपटात इंदुच्या भूमिकेत दिसणार आहे. डेटिंग अॅपशी संबधीत या चित्रपटाची कथा आहे. इंदुच्या आयुष्यात डेटिंग अॅपच्या माध्यमातून काय काय घडामोडी घडतात, ते यामध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाव्यतीरिक्त कियाराची 'गिल्टी', 'शेरशाह', 'भूलभूलैय्या २' आणि 'कंचना' यांसारख्या चित्रपटातही वर्णी लागली आहे.

हेही वाचा -सरोज खान यांच्या वाढदिवसानिमित्त 'धक धक गर्ल'च्या खास शुभेच्छा, पाहा व्हिडिओ

Last Updated : Nov 22, 2019, 7:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details